ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी १२ फेब्रुवारी रोजी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मंगळवारी त्यांनी (१३ फेब्रुवारी) भाजपात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या राजीनाम्यानंतर व भाजपा प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून अनेक प्रतिक्रियाही समोर येत आहेत.

‘बिग बॉस’ अभिनेते व शिवसेना ठाकरे गटाचे नेते किरण माने यांनी याच पार्श्वभूमीवर एक फेसबुक पोस्ट शेअर केली आहे. “‘ते’ एक ड्रेनेज झालं आहे. सगळ्या टाकाऊ गोष्टी सामावून घेत आहे. लोकशाहीचं पोट ‘साफ’ होत आहे!” असं किरण मानेंनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Rohit Pawar
“पाणी वाटपासाठी महिलांना पैसे दिले” म्हणणाऱ्या रवी राणांना रोहित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “एवढा खर्च केला असेल, तर…”
Ravi Kishan DNA test,
रवी किशन यांच्या डीएनए चाचणीची मागणी न्यायालयाने फेटाळली
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
sanjay raut narendra modi
“रोज नवे जोक, देशात जॉनी लीवरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून संजय राऊतांचा टोला

हेही वाचा : तरुणाकडून श्वानाला बेदम मारहाण; व्हायरल व्हिडीओ पाहून रितेश देशमुख संतापला; म्हणाला, “याला तुरुंगात…”

अशोक चव्हाणांच्या भाजपा प्रवेशानंतर किरण मानेंनी शेअर केलेली ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया देत आपलं मत मांडलं आहे. एका युजरने कमेंट करत “चांगलंच आहे की, सगळा भ्रष्ट कचरा तिकडे गेला, की आपण इकडे स्वच्छतेच्या पारड्यात मत टाकायला मोकळे!” असं म्हटलं आहे. तर, दुसऱ्या एका नेटकऱ्याने, “आता फक्त आमच्याकडे फाटक्या नोटा बदलून मिळतील एवढाच बोर्ड लावायचा बाकी ठेवलाय सर…” अशी कमेंट किरण मानेंच्या पोस्टवर केली आहे.

kiran
किरण मानेंच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी मांडलं मत

दरम्यान, भाजपा प्रवेशावर अशोक चव्हाण यांनी “इतकी वर्षे काँग्रेससाठी काम केल्यावर आता मी माझ्या ३८ वर्षांच्या राजकीय प्रवासाची दिशा बदलतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन या देशात आणि राज्यात चांगलं काम करता आलं पाहिजे, सकारात्मक भूमिका घेऊन पुढील वाटचाल करता आली पाहिजे, राज्याच्या आणि देशाच्या प्रगतीत आपलं योगदान असलं पाहिजे, अशी माझी भावना आहे. याच प्रामाणिक भूमिकेतून मी आज भाजपात प्रवेश करतोय.” अशी प्रतिक्रिया दिली आहे.