अभिनेते किरण माने मराठी बिग बॉसमुळे खूपच चर्चेत राहिले. बिग बॉस संपून चार महिने होत आले आहेत, पण आताही किरण माने बिग बॉसमधील काही व्हिडीओ शेअर करत असतात. अशीच एक व्हिडीओ क्लिप त्यांनी शेअर केली आहे. यामध्ये ते राखी सावंतबरोबर फ्लर्ट करताना दिसत आहेत.

सेटवर पहिली भेट अन् विवाहित आदित्य चोप्राच्या प्रेमात पडलेली राणी मुखर्जी; लग्न करण्यासाठी निर्मात्याने पहिल्या पत्नीला दिला घटस्फोट

किरण माने अनेकदा बिग बॉसमधील आठवणी शेअर करत असतात, शोमधील लहान-लहान व्हिडीओ ते त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करतात. असाच एक व्हिडीओ त्यांनी शेअर केलाय. “…फक्त रविवारचा टाईमपास म्हनून बघा भावांनो ! लै सिरीयस्ली घेवू नका. मी सातारला माझ्या घरी हाय. दोन घास सुखानं खातोय ते खाऊ द्या. …बाकी बिगबॉसमध्ये राखीबरोबर फ्लर्ट करायला लै मज्जा आली गड्याहो! किसको पता था, पहलू में रखा, दिल ऐसा पाजी भी होगा…” असं कॅप्शन त्यांनी हा व्हिडीओ शेअर करताना दिलंय.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या व्हिडीओमध्ये ते राखीबरोबर फ्लर्ट करत आहेत. माने तुम्ही मला कधीच प्रपोज केलं नाही, त्यावर किरण माने मजेशीर उत्तर देतात. ते राखीला सातारची सून बन, असंही गमतीत म्हणताना दिसतात. त्यांचा हा व्हिडीओ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून ते व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.