‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम आज घराघरांत लोकप्रिय आहे. या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकार प्रसिद्धीझोतात आले. शिवाली परब सुद्धा हास्यजत्रेमुळे सर्वत्र लोकप्रिय झाली. सुरुवातीच्या काळात प्रचंड संघर्ष करून तिने आयुष्यात एवढं मोठं यश मिळवलं आहे. आता शिवालीने वैयक्तिक आयुष्यात मोठी भरारी घेतली आहे. काही दिवसांपूर्वीच शिवालीने मुंबईत तिचं हक्काचं घर खरेदी केलं. या घरात अभिनेत्रीने तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गृहप्रवेश केला आहे. याची खास झलक शिवालीने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवाली, तिची बहीण व आई-बाबा असे सगळे मिळून गृहप्रवेश पूजेला बसल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. याशिवाय शिवालीने घराच्या दारावर लावलेल्या ‘परब’ या युनिक नेमप्लेटने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “रोजच तुझा दिवस असतो…”, सिद्धार्थ चांदेकरची लाडक्या आईसाठी खास पोस्ट, दिलं गोड सरप्राइज

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शिवाली लिहिते, “१० मे २०२४…नमस्कार! पहिलं तर सगळ्यांना खूप-खूप धन्यवाद! माझ्या वाढदिवसानिमित्त कॉल मेसेज करून शुभेच्छा दिल्यात. असाच तुम्हा सगळ्यांचा आशीर्वाद राहूदे आणि या आशीर्वादामुळेच मी अक्षय्य तृतीयेच्या शुभदिनी माझ्या आई बाबांसाठी स्वत:चं, हक्काचं एक घर घेतलं.”

हेही वाचा : Video : “पप्पा आपली गाडी…”, लोकप्रिय अभिनेत्रीने घेतली नवीन गाडी; लेकीचं सरप्राईज पाहून आई-बाबा भावुक

अभिनेत्री पुढे म्हणते, “काल गृहप्रवेश झाला, आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं जे प्रत्येक माणसाचं स्वप्न असतं म्हणजे स्वःतच एक ‘घर’. खरंतर, हे घर माझं स्वप्न नाही माझ्या आई- बाबांचं स्वप्न आहे आणि त्यांचे ऋण कधीच फेडले जाणार नाहीत…माझं छोटंसं गिफ्ट माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या आई-बाबांसाठी…इतके वर्षे भाड्याच्या घरात राहिलो. हा प्रवास चाळीतून थेट मोठ्या बिल्डिंगच्या २ बीएचके अपार्टमेंटपर्यंतचा होता. प्रवास खूप गोड होता, शिकण्यासारखा होता सगळ्यांचे खूप आभार माझ्याबरोबर तुमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा कायम असूद्या.”

हेही वाचा : कलर्सची ‘ही’ लोकप्रिय मालिका वर्षभरातच घेणार प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांच्या पोस्टने वेधलं लक्ष

“हा व्हिडिओ यासाठी टाकतेय कारण, आई बाबांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद कायम माझ्या स्मरणात राहावा…व्हिडीओ पोस्ट करताना मन भरुन आलं आहे. काहीतरी मिळवल्याचा हा आनंद कमालीचा आहे…Thank You Everyone” अशी पोस्ट शिवालीने शेअर केली आहे.

दरम्यान, शिवालीच्या या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अक्षया नाईक, ओंकार राऊत, नम्रता संभेराव, सीमा घोगळे, प्रियदर्शिनी इंदलकर, पृथ्वीक प्रताप या कलाकारांनी कमेंट्स करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtrachi hasya jatra fame shivali parab bought new and first house in mumbai shares special video sva 00
First published on: 12-05-2024 at 15:20 IST