छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रम म्हणून महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाला ओळखले जाते. या कार्यक्रमातील सर्वच कलाकार हे कायमच चर्चेत असतात. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेल्या अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकरने मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. नुकताच प्रियदर्शनीने तिचा वाढदिवस साजरा केला. वाढदिवस झाल्यावर अभिनेत्रीने आपल्या चाहत्यांची माफी मागितली आहे. यामागे नेमके काय कारण आहे जाणून घेऊया…

हेही वाचा : अमिताभ बच्चन आणि प्रभासच्या बहुचर्चित ‘प्रोजेक्ट के’ चित्रपटात साऊथच्या मेगास्टारची एन्ट्री! बिग बी पोस्ट शेअर करीत म्हणाले…

१९ जूनला प्रियदर्शनीने तिचे जवळचे मित्र, महाराष्ट्राची हास्यजत्रेमधील कलाकार आणि कुटुंबीयांबरोबर आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानंतर प्रियदर्शनीने तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “मला माफ करा…वाढदिवशी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोहोचल्या पण, मी सर्वांना उत्तर देऊ शकले नाही. माझा संपूर्ण दिवस अतिशय छान गेला. गेल्या वर्षभरात मी अनेक गोष्टी शिकले, नवे लोक, नव्या उपक्रमांमध्ये सहभागी झाले. आता या वर्षात अधिक जबाबदाऱ्या आहेत. मला आशा आहे की, मी तुमच्या सर्व आशीर्वादाने चांगले काम करत राहीन! मी तुम्हा सर्वांचे आभारी आहे…पुढच्या वर्षाची मी वाट पाहिन.”

हेही वाचा : Video : “राघव चड्ढांबरोबर लग्न केव्हा करणार?” पापाराझींच्या प्रश्नावर परिणीती चोप्राने दिली अशी प्रतिक्रिया; व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रियदर्शनीने इन्स्टग्रामवर तिच्या वाढदिवसाचे काही फोटोज शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्री तिचे कुटुंबीय आणि महाराष्ट्राची हास्यजत्रामधील कलाकार यांच्याबरोबर वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. दरम्यान, अलीकडेच अभिनेत्रीने मराठी चित्रपटात पदार्पण केले होते. तिचा‘फुलराणी’ हा चित्रपट बुधवारी २२ मार्चला प्रदर्शित झाला होता.