scorecardresearch

Premium

आई-वडिलांचा लग्नाला विरोध, तर आजी…; ‘अशी’ आहे विशाखा सुभेदार यांची फिल्मी लव्हस्टोरी, म्हणाल्या, “घरात कोंडून…”

१९९८ मध्ये त्यांनी महेश सुभेदार यांच्याशी लग्नगाठ बांधली. पण त्यांची लव्हस्टोरी एखाद्या चित्रपटातील लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही.

Vishakha Subhedar lovestory

विशाखा सुभेदार या मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. त्यांच्या कामाचे, त्यांच्या विनोदाच्या टायमिंगचे लाखो चाहते आहेत. विशाखा सुभेदार देखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घडामोडी त्यांच्या चाहत्यांशी शेअर करत असतात. १९९८ मध्ये त्यांनी महेश सुभेदार यांच्याशी लग्नगाठ बांधली. आता विशाखा यांनी त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे.

सोशल मीडियावरून अनेकदा विशाखा महेश यांच्याबद्दल व्यक्त झाल्या आहेत. विशाखा यांना त्यांच्या करिअरमध्ये महेश यांचा भक्कम पाठिंबा मिळाला आहे. हे दोघेही मनोरंजनसृष्टीत कार्यरत आहेत. त्यांची लव्हस्टोरी ही एखाद्या चित्रपटातील लव्हस्टोरीपेक्षा कमी नाही.

nafe singh rathee
हरियाणामध्ये गोळ्या झाडून हत्या झाली ते आयएनएलडी प्रदेशाध्यक्ष नफेसिंह राठी कोण होते?
Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत
Anand Mahindra Offered Thar Car To Sarfaraz Khan Father
हिंमत हरु नका! आनंद महिंद्रांनी सरफराज खानच्या वडिलांना दिली मोठी ऑफर, म्हणाले ‘प्रेरणादायी वडील…’
Viral Video Gautami Patil went on stage and was hugged by a little girl Both are dancing viral
गौतमी पाटीलला स्टेजवर जाऊन चिमुकलीने मारली मिठी…दोघींचे नृत्य पाहून चाहते झाले फिदा, पाहा Viral Video

आणखी वाचा : “महाराष्ट्राची हास्यजत्रामध्ये फटकारलं, टोमणे खावे लागले…” विशाखा सुभेदार यांनी सांगितलं कार्यक्रम सोडण्याचं खरं कारण, म्हणाल्या, “स्किट झाल्यानंतर…”

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मी आधी महेशला ‘महेश दादा’ असं म्हणायचे. आमची काकस्पर्श या नाटकाच्या निमित्ताने पहिल्यांदा भेट झाली. त्या नाटकात तो काम करायचा आणि त्या नाटकाचं सहाय्यक दिग्दर्शनही त्याने केलं होतं. एक दिवस त्यानेच मला सांगितलं की मला दादा म्हणू नकोस. तेव्हा मी खूप लहान होते. आपल्या बायकांना काळजी घेणारा, समजूतदार, प्रेम करणारा असा जोडीदार हवा असतो. आजची पिढी खूप प्रॅक्टिकल आहे. आजच्या मुली सर्व बाजूंनी विचार करून जोडीदार निवडतात. आमच्या वेळेची पिढी आर्थिक गणितं वगैरे यांचं फार विचार करायची नाही. महेशने मला विचारलं. कालांतराने मला त्याचं माझ्यावर लक्ष ठेवणं, माझी काळजी घेणं, माझ्यावर प्रेम करणं आवडू लागलं आणि मी त्याला होकार दिला.”

पुढे त्या म्हणाल्या, “आमच्या लग्नाला माझ्या घरून आई-वडिलांचा विरोध होता. कारण आधीच माझ्या वडिलांना मी नाटकात काम केलेलं आवडत नव्हतं. त्यातून जावईही नाटकात काम करणारा असल्याने ते आमच्या लग्नाच्या विरोधात होते. पण माझ्या आजीने आई-बाबांना सांगितलं, आपल्या मुलीला या क्षेत्राची आवड आहे. जातीच्या दृष्टीने बघायला गेलं तर आमच्या मराठा लोकांमध्ये कोणाला या क्षेत्राची आवड नसणार की ते मुलीला या क्षेत्रात एवढं पुढे येऊ देतील. हे म्हणजे त्याकाळी. पण आता काळ खूप बदलला आहे. आता जाती-धर्मावर काहीही अवलंबून नाही. सगळ्या मुली त्यांना ज्या हव्या त्या क्षेत्रात काम करतात. पण आमच्या वेळी थोडं ते होतं. तेव्हा आजी माझ्या आई-बाबांना म्हणाली होती की, सुदैवाने असा मुलगा मिळाला आहे जो तिला क्षेत्रात पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहन देईल. तर तुम्ही का तिला थांबवून ठेवत आहात? आजीने सांगितल्यावर माझ्या आई-वडिलांनी देखील या बाजूने विचार केला आणि आमच्या लग्नाला संमती दिली.”

हेही वाचा : “नवीन मालिका खूपच वाईट आणि…” नेटकऱ्याच्या स्पष्ट प्रतिक्रियेवर विशाखा सुभेदारने दिलेलं उत्तर चर्चेत, म्हणाली…

यानंतर त्यांनी सांगितलं, “माझ्या घरच्यांनी माझ्या आणि महेशच्या लग्नाला परवानगी दिली, पण माझ्या आजी-आजोबांची महेशसमोर एक मोठी अट होती की, आमची मुलगी टीव्हीमध्ये दिसली पाहिजे. ते मात्र माझ्या नवऱ्याने क्षणाक्षणाला जपलं. पण आमची लव्ह स्टोरी खूप कमाल होती. माझ्या आणि महेशच्या नात्याबद्दल घरी कळल्यावर आई १५ दिवस बोलत नव्हती, मग घरी कोंडून फूल एक दुजे के लिए… लहान वयात प्रेमात पडल्यामुळे आमचं लग्नही लवकर झालं. २१ वर्षांची असताना मी लग्न केलं.” तर आता विशाखा आणि महेश यांच्या या फिल्मी लव्हस्टोरीवर त्यांचे चाहते विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtrachi hasyajatra fame vishakha subhedar shares her love story rnv

First published on: 16-09-2023 at 16:43 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×