scorecardresearch

Premium

राणादा-पाठकबाईंच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण, अक्षया देवधर पोस्ट करत म्हणाली, “माझा नवरा…”

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

hardeek joshi and akshaya deodhar
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण

मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय जोडपं म्हणून अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर म्हणून ओळखले जाते. हार्दिक आणि अक्षया २ डिसेंबर २०२२ ला लग्नबंधनात अडकले. आज त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्ताने अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हार्दिक जोशीने नुकतंच इन्स्टाग्रामवर लग्नातील काही खास फोटो पोस्ट शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्याने अक्षयाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट आहेस. लग्नाला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा”, असे हार्दिकने म्हटले आहे.
आणखी वाचा : “मानसी नाईकने तुझ्यावर आरोप केले, पण…”, ‘चंद्रमुखी’च्या वादावर चाहतीचा प्रश्न; अमृता खानविलकर म्हणाली…

bachchu kadu chandrashekhar bawankule
“भाजपा छोट्या पक्षांना वापरून फेकून देते”, बच्चू कडू-महादेव जानकरांच्या आरोपांना बावनकुळेंचं उत्तर; म्हणाले, “जाणीवपूर्वक…”
Sanjay Gaikwad hunted tiger
“मी वाघाची शिकार करून त्याचा दात…”, संजय गायकवाडांचा अजब दावा; म्हणाले, “बिबट्यांना मी सहज…”
Raj Thackeray comment on Ajit Pawar
दुर्मिळ फर्मान पाहून राज ठाकरेंची अजित पवारांवर मिश्किल टिप्पणी; उपस्थितांमध्ये पिकला हशा, म्हणाले, “स्वल्पविराम..”
Aniket saraf post for father ashok saraf
“माझ्या वडिलांनी एक अभिनेता आणि माणूस म्हणून…”, अशोक सराफ यांच्यासाठी मुलाने केलेली पोस्ट चर्चेत

तसेच अक्षयानेही हार्दिकसाठी एक खास पोस्ट केली आहे. तिने हार्दिकसोबतचे तीन खास फोटो यावेळी शेअर केले आहेत. त्या फोटोला कॅप्शन देताना तिने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

“एक वर्ष पूर्ण झाले, अजून खूप वर्ष बाकी आहेत. लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हार्दिक. माझा नवरा, माझा जोडीदार, माझा प्रियकर आणि माझा जिवलग मित्र झाल्याबद्दल धन्यवाद. मी तुझ्यावर खूप प्रेम करते”, असे हार्दिकने म्हटले आहे.

आणखी वाचा : काय सांगता! ‘ठिपक्यांची रांगोळी’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; कधी, कुठे पाहता येणार? घ्या जाणून

त्या दोघांच्या या पोस्टनंतर मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री श्रेया बुगडने “माझे करण-अर्जुन तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा”, अशी कमेंट यावर केली आहे. तर हार्दिकने या कमेंटवर उत्तर देताना ‘आय लव्ह यू’ असे म्हटले आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Marathi actor hardeek joshi and akshaya deodhar first marriage anniversary share instagram post nrp

First published on: 02-12-2023 at 13:31 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×