गेल्या काही दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाची विजेती मेघा धाडे चांगलीच चर्चेत आली आहे. चर्चेच कारण आहे व्यवसाय. मेघाने राजकारणानंतर व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. रत्नागिरीत तिने नवा आलिशान व्हिला सुरू केला आहे; जो पर्यटकांसाठी खुला झाला आहे. मेघाच्या या नव्या व्हिलावर नुकत्याच तिच्या जीवाभावाच्या मैत्रीण सई लोकूर व शर्मिष्ठा राऊत आपल्या पतीसह सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी गेल्या होत्या. याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सई लोकूरने मेघाच्या व्हिलामधील झोक्यावर झुळतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओवरून अभिनेत्रींना अनेकांनी वजनावरून ट्रोल असून या ट्रोलर्सना अभिनेत्री मेघा धाडेने चांगलंच उत्तर दिलं आहे.

हेही वाचा – Video: रकुल प्रीत सिंग-जॅकी भगनानीच्या संगीत सोहळ्यात शिल्पा शेट्टीचा पत्नीसह जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘झोका तुटले…तीन हत्ती.’ या नेटकऱ्याला जबरदस्त उत्तर देत मेघा म्हणाली, “झोक्याची काळजी करू नकोस स्वतःची कर. उगाच समोर आलास तर पायाखाली चिरडला जाशील म्हणून म्हटलं उंद्रा.” तर दुसरा नेटकऱ्याने लिहिलं, ‘काय खाऊन एवढा जाड्या झालात सई आणि मेघा.’ यावर अभिनेत्रीने उत्तर दिलं की, काय खाऊन ते माहित नाही. पण तुझ्या पिताश्रींचं नक्कीच नाही. तसेच तिसरा नेटकऱ्याने लिहिलं, ‘तुटेल ते.’ याला उत्तर देत मेघा म्हणाली, “झुल्याची काळजी करू नकोस.”

हेही वाचा – Video: शिवानी सुर्वे-अजिंक्य ननावरेच्या लग्नातला Unseen व्हिडीओ पाहिलात का? ‘अशी’ झाली होती दोघांची मंडपात एन्ट्री

दरम्यान, गेल्या वर्षी जून महिन्यात मेघा धाडेने भाजपात प्रवेश केला होता. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत तिने भाजपाचा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर ऑगस्टमध्ये मेघाची महाराष्ट्र प्रदेश सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली. सध्या ती महाराष्ट्र प्रदेश भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठ उपाध्यक्ष आहे.