scorecardresearch

“खूप कष्टांनी मी…” लेकीबरोबरचा फोटो शेअर करत मृणाल दुसानीसची खास पोस्ट

अभिनेत्री मृणाल दुसानीसने लेकीबरोबरचा फोटो शेअर करत त्याला खूपच खास कॅप्शन दिलं आहे

“खूप कष्टांनी मी…” लेकीबरोबरचा फोटो शेअर करत मृणाल दुसानीसची खास पोस्ट
मृणाल दुसानीस आणि तिची मुलगी नुर्वी (फोटो सौजन्य- मृणाल दुसानीस इन्स्टाग्राम)

अभिनेत्री मृणाल दुसानीस ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर मृणालने बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केलं. पण लग्नानंतर काही वर्षांनी अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेत मृणाल तिच्या पतीबरोबर अमेरिकेला स्थायिक झाली. मार्च २०२२ ला मृणालने एका गोंडस मुलीला जन्म दिला. ही गुडन्यूज तिने सोशल मीडियावरून चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

मृणाल दुसानीसने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला असला तरीही ती सोशल मीडियाच्या माध्यमातून मात्र नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते. ती आपल्या लेकीबरोबरचे फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आताही मृणालने लेक नुर्वीबरोबरचा एक गोड फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या फोटोला तिने खूपच खास कॅप्शन दिलं आहे.

आणखी वाचा- आता अशी दिसते मराठी मालिकांमध्ये काम करणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री, अभिनयक्षेत्रामधून ब्रेक घेत अमेरिकेमध्ये स्थायिक झाली अन्…

मृणाल दुसानीसने इन्स्टाग्रामवर नुर्वी आणि स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघीही खूप क्यूट दिसत आहेत. हा फोटो शेअर करताना मृणालने लिहिलं, “कसे आहात सगळे? खूप कष्टांनी मी हा फोटो काढला आहे. आमचा दोघींचा असा पहिलाच फोटो. त्यामुळे खूप खास आहे माझ्यासाठी.” या कॅप्शनबरोबर तिने #motherdaughtertime हा हॅशटॅगही वापरला आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप चर्चेत असून चाहत्यांनी यावर कमेंट्स करत नुर्वीचं कौतुक केलं आहे.

आणखी वाचा- PHOTOS: नाशिक ते मुंबई, मृणालने मायानगरीत कष्टाने बनवली ओळख

मृणालने २०१६ मध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर नीरज मोरेबरोबर लग्नगाठ बांधली. नीरज आणि मृणाल हे दोघेही सध्या अमेरिकेमध्ये राहत आहेत. मृणालने यावर्षी २४ मार्च रोजी मुलीला जन्म दिला. आई झाल्यानंतर मृणालने काही काळ तरी कलाक्षेत्रापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असावा. ‘सुखांच्या सरींनी मन हे बावरे’ ही मृणालची शेवटची मालिका होती. या मालिकेनंतर मृणाल छोट्या पडद्यावर दिसलीच नाही. पण सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 09:02 IST

संबंधित बातम्या