Premium

मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर आता मुग्धा वैशंपायन लवकरच चढणार बोहल्यावर; गायिकेच्या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो आले समोर

मुग्धा वैशंपायनच्या ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे पाहा फोटो

Mugdha Vaishampayan bride to be party party
मुग्धा वैशंपायनच्या 'ब्राइड टू बी' पार्टीचे पाहा फोटो

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून घराघरात पोहोचलेली लोकप्रिय गायिका मुग्धा वैशंपायन हिने प्रेमाची कबुली दिल्यापासून चांगलीच चर्चेत आहे. जून महिन्यात मुग्धा आणि तिचा होणारा नवरा प्रथमेश लघाटेने सोशल मीडियावर फोटो शेअर करून आमचं ठरलंय असं जाहीर केलं. त्यानंतर दोघांच्या केळवणाला सुरुवात झाली. नोव्हेंबरमध्ये मुग्धा आणि प्रथमेशने गुपचूप साखरपुडा उरकला. तेव्हापासून दोघांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता लवकरच मुग्धा बोहल्यावर चढणार आहे. नुकतीच तिची ‘ब्राइड टू बी’ पार्टी झाली असून सध्या या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही दिवसांपूर्वीच मुग्धाची मोठी बहीण मृदुल वैशंपायन हिचा मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा पार पडला. अलिबागचे प्रसिद्ध जोगळेकर फार्मचे विश्वजीत जोगळेकरबरोबर मुग्धाच्या मोठ्या बहिणीने लग्नगाठ बांधली. लग्नासाठी मुक्ताच्या बहिणीने खास पारंपरिक लूक केला होता. लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा शेला तिने घेतला होता. या लूकमध्ये मृदुलाचं सौंदर्य चांगलंच खुललं होतं. मृदुलच्या पतीने लाल रंगाचे सोवळं आणि उपर्ण परिधान केलं होतं. आता मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर मुग्धा लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

मुग्धाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ‘ब्राइड टू बी’ पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. लग्न होण्याआधी ‘ब्राइड टू बी’ पार्टी मित्र-मैत्रीणींकडून किंवा भावंडांकडून दिली जाते. अशाच प्रकारे मुग्धाची देखील ‘ब्राइड टू बी’ पार्टी पार पडली आहे. याच पार्टीवरून लवकरच मुग्धा देखील लग्नबंधनात अडकणार असल्याचा अंदाज लावला जात आहे.

हेही वाचा – Video: लिफ्ट बंद होत असताना दरवाजामध्ये पाय टाकून बाहेर पडली मराठी अभिनेत्री; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “येडे चाळे करायची…”

हेही वाचा – Video: “…एकदा येऊन तर बघा”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रोहित मानेच्या बायकोने घेतला खास उखाणा; व्हिडीओ झाला व्हायरल

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी कशी सुरू झाली?

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मध्येच मुग्धा आणि प्रथमेशची ओळख झाली. त्यानंतर दोघांचे एकत्र गाण्याचे कार्यक्रम सुरू झाले. या गाण्यांच्या कार्यक्रमामुळे मुग्धा आणि प्रथमेशचं सतत भेटणं होऊ लागलं. यादरम्यान दोघांना एकमेकांविषयी भावना निर्माण झाल्या. त्यानंतर प्रथमेशने एका कार्यक्रमाच्या तालीमच्या वेळी आवांतर गप्पा झाल्यानंतर मुग्धाला विचारलं. प्रथमेश विचारणार याची मुग्धाला थोडी कल्पना होती. मुग्धाचे उत्तर काय असणार? हे प्रथमेशला माहित होतं. पण तरीही मुग्धाने प्रथमेशला होकार देण्यासाठी तीन-चार दिवस घेतले. मग एकेदिवशी तिने त्याला भेटायला बोलवून होकार कळवला. त्यानंतर दोघं एकमेकांना डेट करून लागले आणि काही काळाने दोघांनी नात्याबद्दल एकत्र घरच्यांना सांगायचं ठरवलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mugdha vaishampayan bride to be party party pps

First published on: 10-12-2023 at 17:26 IST
Next Story
Video: लिफ्ट बंद होत असताना दरवाजामध्ये पाय टाकून बाहेर पडली मराठी अभिनेत्री; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “येडे चाळे करायची…”