‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वातून आपल्या सुरेल आवाजाने मनं जिंकणाऱ्या पंचरत्नांपैकी एक म्हणजे प्रथमेश लघाटे. लहानपणापासून गाण्याची गोडी लागलेला प्रथमेश लघाटे आता एक उत्कृष्ट गायक आहे. अभंग, भावगीते, भक्तीगीते प्रथमेश उत्तम गातो. त्याच्या आवाजाचा मोठा चाहता वर्ग आहे. अशा या लोकप्रिय गायकाचं भक्तीगीत बॉलीवूड अभिनेत्री अदा शर्मानं गायलं होतं; जे ऐकून प्रथमेश भारावून गेला.

२०२१मध्ये प्रथमेश लघाटेचं ‘अंतरी माझ्या श्रीराम’ हे भक्तीगीत प्रदर्शित झालं होतं. या भक्तीगीतासाठी फक्त त्याने आवाज दिला नव्हता, तर तबला, ताल वाद्य, तालवाद्य संयोजन, मिक्सिंग, मास्टरींग, सिनेमॅटोग्राफी, व्हिडीओ ए़डिटिंग या सर्व जबाबदारी उत्तमरित्या पेलल्या होत्या. हेच भक्तीगीत अभिनेत्री अदा शर्माने गायलं होतं. याचा व्हिडीओ आज प्रथमेश लघाटेने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे.

samarjit singh
कर्ता पुरुषच गेला,आता आम्हाला आधार कुणाचा? लोकरेंच्या पत्नी, मातेच्या आक्रोशाने समरजितसिंह घाटगेंसह नातेवाईक गलबलले
Sexual harassment by giving drugged in drink vandalism of three coffee shops by Yuva Shivpratisthan
गुंगीचे पेय देऊन लैंगिक अत्याचार, तीन कॉफी शॉपची युवा शिवप्रतिष्ठानकडून तोडफोड
Salman Khan firing case marathi news, Lawrence Bishnoi gangster arrested marathi news
सलमान खान गोळीबार प्रकरण : हरियाणातून लॉरेन्स बिष्णोई टोळीच्या गुंडाला अटक
Ulta-Chashma
उलटा चष्मा: मतदान यंत्राची कृपा…
Ragini Khanna reacts on converting religion
गोविंदाच्या भाचीने सोडला हिंदू धर्म? अभिनेत्री रागिनी खन्ना धर्मांतराच्या ‘त्या’ पोस्टबद्दल म्हणाली, “मी माझा धर्म…”
Deepak Tijori reveals Amrita Singh tried to stop Saif Ali Khan
मित्राच्या मदतीसाठी तयार होणाऱ्या सैफला अमृता सिंहने रोखलं होतं; प्रसिद्ध अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
man arrested for beating woman in kanpur
इन्स्टावर प्रेयसीनं सांगितलं २० वर्षं वय, प्रत्यक्ष भेटीत सत्य आलं समोर; महिलेला मारहाण प्रकरणी प्रियकराला अटक!
sam pitroda controversial statement
सॅम पित्रोदा आणि गांधी घराण्याचं नेमकं काय कनेक्शन?

हेही वाचा – एका चाहतीला संकर्षण कऱ्हाडेशी करायचं होतं लग्न, पण…; अभिनेत्याने स्वतः सांगितला ‘तो’ किस्सा, म्हणाला, “किती गोड…”

प्रथमेशने अदाचा व्हिडीओ शेअर करत मूळ भक्तीगीताच्या व्हिडीओची लिंक दिली आहे. तसंच अदाला स्टोरी टॅग करून त्याच्यापुढे फुलाचा व हात जोडण्याचा इमोजी दिला आहे.

हेही वाचा – KGF फेम यशने नाकारली ‘रामायण’तील रावणाची भूमिका अन् ८० कोटींची ऑफर, आता दिसणार ‘या’ महत्त्वाच्या भूमिकेत

अदाच्या या व्हिडीओला ५ लाखांहून अधिक लाइक्स आहेत. तर ४९ लाखांहून अधिक व्ह्यूज आणि ४ हजारांहून अधिक प्रतिक्रिया अदाच्या व्हिडीओला आहेत. तसंच प्रथमेशने गायलेल्या मूळ भक्तीगीताला युट्यूबवर १२ लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत. तर २२ हजारांहून अधिक लाइक्स आहेत.