अभिनेत्री तेजश्री प्रधानने आपल्या सहसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात एक कायमच स्थान निर्माण केलं आहे. मराठी मालिकाविश्वात तेजश्री ही आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिची कुठलीही मालिका असो ती हिट होतेच.

सध्या तेजश्री ‘स्टार प्रवाह’वरील ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत तिने साकारलेली मुक्ता प्रेक्षकांना अल्पावधीत पसंतीस पडली आहे. तेजश्रीची ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. टीआरपीच्या शर्यतीतही ‘प्रेमाची गोष्ट’ अव्वल स्थानावर आहे. अशातच एका व्हिडीओमधून तेजश्रीचा क्रेझी अंदाज पाहायला मिळाला.

हेही वाचा – Video: साखरपुडा होताच शिवानी सोनार लागली कामाला, दिसणार नव्या भूमिकेत

तेजश्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला. व्हिडीओमध्ये अभिनेत्री बरोबर असलेली व्यक्ती तिची बहीण आहे. दोघी मस्त त्यांच्या क्रेझी अंदाजात आनंद लुटताना दिसत आहेत. तेजश्रीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतं आहे.

हेही वाचा – Video: “बॉयकॉट एपी ढिल्लों…”, लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायकाने स्टेजवर आपटून फोडली गिटार, व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले…

तेजश्रीचा हा व्हिडीओ आतापर्यंत २ लाख ९५ हजारांहून अधिक युजरने पाहिला आहे. तसेच १६ हजारहून अधिक युजरने लाइक केला आहे. याशिवाय या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत. “तेजश्री खूप सुंदर मुलगी आहे”, “नैसर्गिक हिरोईन”, “मस्त आहे”, “क्यूट”, अशा अनेक प्रतिक्रिया युजरने तेजश्रीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.