scorecardresearch

“इस्लाम धर्माची थट्टा…” ‘त्या’ व्हिडीओमुळे राखी सावंत झाली ट्रोल

आता तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

rakhi sawant

हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती जिथे जाईल तिथे तिच्या भोवती नेहमीच पापराझींचा गराडा असतो. आता असाच तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे ज्यात तिने स्वतःला गरीब म्हणून संबोधलं आहे. पण तिचा लूक पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.

राखी सावंतचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. राखी सावंत नुकतीच लोखंडवाला परिसरात खरेदीसाठी आली होती. त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. यात गुलाबी रंगाचा क्रॉप टॉप आणि शॉर्ट्स परिधान करत तिने बोल्ड अंदाज दाखवला आहे. यात ती एका दुकानातून बाहेर पडताना दिसत आहे. तिने मनसोक्त खरेदी केली. यावेळी तिला मीडिया फोटोग्राफर्सनी गाठलं. तेव्हा ती त्यांच्यापासून दूर जाण्यासाठी प्रयत्न करू लागली. त्यावेळी बोलताना “मी गरीब आहे, मला जाऊदे.” असं ती म्हणाली. इतकंच नाही तर तिने एका रिक्षा चालकालाही मोफत एके ठिकाणी सोडण्यास सांगितलं.

आणखी वाचा : वयाच्या ४४ व्या वर्षी राखी सावंत गरोदर? प्रतिक्रिया देत अभिनेत्री म्हणाली…

राखी म्हणाली, “तुम्ही लॅक्मे फॅशन वीक करत आहात आणि मी लोखंडवाला फॅशन वीक करत आहे. रझिया फंसी गुंडों में तसं राखी फंसी मीडिया में. मला सोडा, मला जाऊदे. मी गरीब आहे. माझी गाडी कुठे आहे?” इतक्यात ती एका थांबलेल्या रिक्षापाशी गेली आणि रिक्षा चालकाला म्हणाली, “तुम्ही मला तुमच्या रिक्षेत बसवून घ्याल का? पण माझ्याकडे पैसे नाहीयेत.” तिचं हे म्हणणं रिक्षा चालक मान्य केलं.” राखी रिक्षात बसल्यावर “मी गरीब आहे,” असं म्हणत त्या रिक्षा चालकाला थोडं पुढे सोडण्यास सांगितलं.”

हेही वाचा : Video: “किती ती ओव्हर अ‍ॅक्टिंग…” सतीश कौशिक यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया देताच राखी सावंत ट्रोल

आता तिचा हा व्हिडीओ खूपच व्हायरल होत असून या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध पतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल व्हायला लागली आहे. एकाने लिहीलं, “लॅक्मे फॅशन वीकमध्ये तुला आमंत्रित केलं गेलं असतं तर तो फॅशन डिझाईनर्स आणि मॉडेल्सचा अपमान असेल.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “रोजेही करणार ब्रा घालून? का इस्लाम धर्माची थट्टा करतेस तू.. तू कधीही तुझं घर बनवू शकणार नाहीस.” आणखी एकाने लिहीलं, “हिला प्राणी संग्रहालयात ठेवलं पाहिजे, वेगळ्या पिंजऱ्यात.” आता या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-03-2023 at 13:23 IST