scorecardresearch

Premium

“अखेर मला अधिकृतरित्या…” प्रथमेश लघाटेच्या पोस्टने वेधलं लक्ष, फोटो शेअर करत म्हणाला…

त्यातच आता प्रथमेशने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

prathamesh laghate
प्रथमेश लघाटे

सध्याच्या तरुण पिढीतील आघाडीच्या गायकांपैकी एक म्हणून प्रथमेश लघाटेला ओळखले जाते. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून ते प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचला. त्याच्या गायनाचं नेहमीच भरभरून कौतुक होत असतं. काही दिवसांपूर्वी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी प्रेमाची कबुली दिली होती. त्यातच आता प्रथमेशने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.

प्रथमेश लघाटे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच प्रथमेशने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात त्याने त्याला ब्लू टिक मिळाल्याचे सांगितले आहे.
आणखी वाचा : “हा अधिक श्रावण आहे, यानंतर श्रावण लागेल”, चाहत्याच्या कमेंटवर प्रथमेश लघाटेने दिलं उत्तर, म्हणाला “तुमच्या माहितीसाठी…”

anushka sharma
गरोदरपणाच्या चर्चांवर अनुष्का शर्माने सोडलं मौन? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण
Siddharth Mitalii
Video: बुर्ज खलिफाच्या सगळ्यात वरच्या मजल्यावरून ‘असा’ दिसतो नजरा, सिद्धार्थ-मितालीने दाखवली खास झलक
vicky katrina
लग्नानंतर पहिल्यांदाच विकी कौशलने केलं बेबी प्लॅनिंगबद्दल भाष्य, म्हणाला, “आमच्या दोघांच्या घरचे…”
virendra pradhan (1)
“…म्हणून भीतीपोटी मी पोस्ट डिलीट केली”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला “धमक्या देण्यापर्यंत…”

“अखेर मला अधिकृतरित्या ब्लू टिक मिळाले. आज माझे इन्स्टाग्राम अकाऊंट व्हेरिफाईड झाले. धन्यवाद इन्स्टाग्राम, असे प्रथमेश लघाटेने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : Video : चांदीच्या ताटातील पक्वान्न, सुंदर उखाणा अन्… प्रथमेश लघाटेच्या पहिल्या केळवणाचा थाट पाहिलात का?

दरम्यान ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रथमेश लघाटे घराघरात पोहोचला. तो सध्या त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. प्रथमेश लवकरच गायिका मुग्धा वैशंपायनबरोबर विवाहबंधनात अडकणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांनी प्रेमाची कबुली दिली.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sa re ga ma pa lil champs fame prathamesh laghate instagram account got verified share post nrp

First published on: 03-10-2023 at 17:49 IST

संबंधित बातम्या

ताज्या बातम्या
मराठी कथा ×