‘बिग बॉस १६’ हा शो दिवसेंदिवस मनोरंजक होत चालला आहे. शोमध्ये अनेक नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. अलीकडेच घरातील स्पर्धकांनी अंकित गुप्ताला घराबाहेर काढल्याचं वृत्त समोर आलंय. अशातच या आठवड्यात वीकेंड का वार दमदार असणार आहे. ‘वीकेंड का वार’मध्ये सलमान खान शालिन भानोत, एमसी स्टॅन आणि टिना दत्ता यांच्यातील नॉमिनेशन टास्कमधील भांडणावर बोलणार आहे. त्यांनी भांडणात एकमेकांना आई-बहिणींवरून शिव्या दिल्याने सलमानने त्यांचा खरपूस समाचार घेतला आहे.

Bigg Boss 16: स्पर्धकांनी अंकित गुप्ताला दाखवला बाहेरचा रस्ता; कारण कळताच ‘बिग बॉस’सह सलमान खानवर संतापले चाहते

प्रोमोमध्ये सलमान खूप रागावलेला दिसत होता आणि ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये नेहमी माफी मागितल्याबद्दल त्याने शालीनची खिल्लीही उडवली. लहान मुलासारखं वागू नकोस, असंही सलमान त्याला म्हणाला. “तुमच्या दोघांच्या वागण्यामुळे तुमच्या आई आणि बहिणीला त्रास का सहन करावा लागतो? तुमच्या भांडणात तुम्ही त्यांच्यासाठी का अपशब्द वापरताय. तुम्ही जे बोलताय त्यावरून तुमची पातळी किती खाली घसरली आहे, ते दिसतंय,” असं तो शालीन व स्टॅनला म्हणतो. एमसी आणि शालीनने दिलेल्या शिव्यांचा उल्लेख करत सलमान त्यांना परत ते बोलायला सांगतो, पण दोघेही पुन्हा शिव्यांचा वापर करणार नाही, असं म्हणतात आणि माफी मागताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रोमोमध्ये बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा देखील त्यांच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आल्याचं दिसत आहेत. सलमान बरोबर दोघेही नाचताना आणि घरातील सदस्यांवर विनोद करताना दिसत आहेत. रितेश स्पर्धक साजिद खानबरोबर मिळून टीना आणि शालीनची मिमिक्री करताना दिसत आहे.