scorecardresearch

Premium

Video : “कोकणातील संस्कृती, केळीच्या पानावर जेवण अन्…”, लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, पाहा व्हिडीओ…

लोकप्रिय मालिकेच्या सेटवर बसली कलाकारांची पंगत, BTS व्हिडीओ व्हायरल…

khushboo tawde shared bts video from the set
लोकप्रिय मालिकेच्या सेटवरील BTS व्हिडीओ व्हायरल

मालिकांच्या सेटवरचे कलाकार तासन् तास सलग शूटिंग करत असतात. यामुळे या कलाकारांमध्ये एक वेगळं नातं तयार होतं. सध्या लोकप्रिय मालिकेच्या सेटवरचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “शिक्षा भोगणं…”, संजय दत्तला आठवले तुरुंगातील दिवस; म्हणाला, “ग्रंथ वाचन, स्वयंपाक अन्…”

11 year old boy created a mosaic art of Shree Ram
Viral video : रुबिक्स क्यूबच्या मदतीने साकारले प्रभू श्रीराम! पाहा ११ वर्षांच्या या मुलाची अद्भुत कला…
amitabh-bachchan2
“प्रादेशिक चित्रपट उत्तम पण…” हिंदी चित्रपटसृष्टीची बाजू घेत अमिताभ बच्चन यांनी केली प्रेक्षकांची कानउघडणी
UK Vs UK Tea Controversy
चहामध्ये मीठ? चहाच्या रेसिपीवरून अमेरिका आणि ब्रिटनमध्ये पेटला वाद; वाचा, नेमके प्रकरण काय?
hrithik-roshan-anil-kapoor
“गेली चार दशकं…” ‘फायटर’च्या प्रमोशनदरम्यान हृतिकचे वक्तव्य ऐकताच अनिल कपूर यांना अश्रु अनावर

गेल्या महिन्यात झी मराठी वाहिनीवर ‘सारं काही तिच्यासाठी’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये अभिनेत्री खुशबू तावडेने महत्त्वाची भूमिका साकारली आहे. अलीकडेच खुशबूने मालिकेच्या सेटवरील पडद्यामागचा व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

हेही वाचा : “त्याने त्याचा जीव का घेतला हे…”, रिया चक्रवर्तीचे सुशांतच्या मृत्यूवर भाष्य; म्हणाली, “मला काळी जादू…”

‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं येत आहेत. संध्यांच्या जाण्याने ओवी परदेशातून परत आली असून, उमाच्या घरच्यांना ही गोष्ट मान्य नाही असं कथानक सध्या मालिकेत सुरू आहे. ओवीचं घरात येणं ऑनस्क्रीन जरी उमाच्या घरच्यांना मान्य नसलं तरी, ऑफस्क्रीन मात्र या कलाकारांमध्ये फारचं सुंदर बॉण्डिंग असल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री खुशबू तावडेने नुकताच सगळे कलाकार पंगतीला एकत्र बसून जेवणाचा आस्वाद घेत असल्याचा BTS व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : Video: ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरी मालिकेच्या सेटवर २ ते ४ काय करते? पाहा…

खुशबूने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये कोकणातील पारंपरिक संस्कृती, केळीच्या पानावरचं जेवणं याची झलक पाहायला मिळत आहे. कोकणात आजही सारवलेल्या जमिनीवर बसून सगळेजण पंगतीत जेवतात. अगदी त्याचप्रमाणे या सेटवरच्या सगळ्या अभिनेत्री केळीच्या पानावर जेवणाचा आस्वाद घेत असल्याचं या पडद्यामागच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. खुशबूने या व्हिडीओला “जेवूक येवा” असं मालवणी कॅप्शन दिलं आहे. दरम्यान, अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sara kahi tichyasathi fame actress khushboo tawde shared bts video from the set sva 00

First published on: 06-10-2023 at 12:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×