मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचा अभिनय क्षेत्रासह वैयक्तिक आयुष्यातला प्रवासदेखील खडतर होता. शर्मिष्ठाच्या ध्यानी मनी नसताना तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. जरी तिने एमबीएची डिग्री घेतली असली तरी या क्षेत्रात मन रुळू लागल्याने तिने अभिनयातंच करिअर केलं. वैयक्तिक आयुष्यात तिने अमेय निपाणकर याच्याशी प्रेमविवाह केला होता. परंतु १० वर्षांच्या संसारानंतर दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शर्मिष्ठा आणि अमेयने २०१८ रोजी घटस्फोट घेतला आणि दोघांनी त्यांच्या नवीन प्रवासाला सुरुवात केली. यादरम्यान शर्मिष्ठा खूप खचली होती. नुकतीच राजश्री मराठीला शर्मिष्ठाने मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने घटस्फोटादरम्यान तिला झालेला त्रास व यातून ती कशी सावरली याबद्दल सांगितलं आहे.

हेही वाचा… जान्हवी कपूरला ‘असा’ हवाय जोडीदार, अपेक्षा सांगत म्हणाली, “जेव्हा मी…”

शर्मिष्ठा म्हणाली, “माझ्या घटस्फोटाच्या वेळेस सीमा देशमुख हिच्याबरोबर मी एक मालिका करत होते. त्या मालिकेचं नाव होतं ‘किती सांगायचंय मला’. तेव्हा मी सेटवर आले की आत जाऊन बसायचे. मला कळायचंही नाही नक्की काय होतंय. मी नुसती बसलेले असायचे तरी माझ्या डोळ्यातून नुसतं घळाघळा पाणी गळायचं. मला कळायचंच नाही की काय चाललंय. त्यावेळेला सीमा यायची आणि ती मला एक घट्ट मिठी मारायची आणि मी फक्त रडायचे.”

शर्मिष्ठा पुढे म्हणाली, “मधुगंधानेसुद्धा त्यावेळेला माझी खूप विचारपूस केली होती. ती रोज उठल्यावर मला फोन करायची आणि विचारायची की बरी आहेस ना. सुकन्या ताईसुद्धा त्यावेळेस मला खूप मेसेज करायची.”

हेही वाचा… घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेवर भारत गणेशपुरे यांची प्रतिक्रिया; म्हणाले, “आपल्याकडे राजकीय पक्षांचे…”

करिअरसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी अशा अनेक लोकांनी मला साह्य केलंय. हे माझे त्यादरम्यान गुरू ठरले आहेत.

मी ‘बिग बॉस’च्या घरात होते तेव्हा एक निर्णय घेतला. तेव्हा रेशम ताई, मेघा,आऊ यांनी सांगून सांगून, माझं ब्रेन वॉश करून मला तो निर्णय घ्यायला लावला होता. तो निर्णय म्हणजे- की मी माझ्या आयुष्याला दुसरी संधी देईन. तो निर्णय म्हणजे माझ्यासाठी लग्न हा होता. तेव्हा मी नुकतीच घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करून बिग बॉसच्या घरात गेले होते.

हेही वाचा… लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हृता दुर्गुळेने शेअर केली पती प्रतीकसाठी खास पोस्ट; म्हणाली, “तू जसा…”

दरम्यान, शर्मिष्ठा राऊतचा निर्मित ‘नाच गं घुमा’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. सहा निर्माते असणारा हा चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. शर्मिष्ठा झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकविन चांगलाच धडा’ आणि ‘नवरी मिळे हिटलरला’ या दोन मालिकांची निर्माती आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sharmistha raut was in a lot of pain after getting divorced with amey nipankar dvr
First published on: 18-05-2024 at 20:19 IST