‘ठरलं तर मग’ आता लवकरच न्यायालयीन लढाई सुरू होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक भागात अर्जुन-सायली साक्षी आणि महिपत विरोधातील पुरावे शोधण्यासाठी धडपड करत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच चैतन्य नशेत असलेल्या साक्षीकडून सगळं सत्य वदवून घेतो आणि त्याच्या हाती मोठा पुरावा लागतो. हा पुरावा घेऊन चैतन्य अर्जुन-सायलीकडे जातो.

एकीकडे या सगळ्या गोष्टी सुरू असताना दुसरीकडे सायली शिवानीची समजूत काढून तिला साक्षीविरोधात साक्ष देण्यास तयार करते. त्यामुळे आता लवकरच शिवानी कोर्टात साक्षीविरोधात साक्ष देणार आहे. यामुळे संपूर्ण बाजी पालटून साक्षी-महिपतचा खोटेपणा भर कोर्टात सिद्ध होणार आहे. सुनावणीच्या थोडावेळ आधी प्रिया अर्जुनच्या घरी येते. प्रियाला घरी आल्याचं पाहून सगळेच आश्चर्य व्यक्त करतात. सायली शिवानीचं खोटं नाव सांगून तिला सुभेदारांच्या घरात ठेवून घेते. प्रिया सायलीबरोबर फिरणारी मुलगी कोण आहे? अशी चौकशी करते… यावर कल्पना खोटं सांगून ती वेळ निभावून नेते.

हेही वाचा : Video : औक्षण, मोदकाचा बेत अन्…; लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी गेली तितीक्षा तावडे, जावयाचं ‘असं’ केलं स्वागत

प्रिया शिवानीला शोधणार इतक्यात अर्जुन तिला अडवतो आणि “मी आता कोर्टात जाऊन तू माझ्या घरी येऊन मला लाज देण्याचा प्रयत्न केलास” असं मी सांगेन असं सांगतो. यावर प्रिया थोडी घाबरते आणि घरची वाट धरते. ती घडला प्रकार साक्षीला फोन करून सांगणार इतक्यात साक्षीचा फोन चैतन्य काढून घेतो आणि “सुनावणीच्या आधी कोणाशीच बोलू नको शांतपणे उत्तरं दे” असं तो तिला सांगतो. आता चैतन्यचं ऐकण्याशिवाय साक्षीकडे काहीच पर्याय राहत नाही.

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या पुढच्या भागात प्रेक्षकांना कोर्टरुम ड्रामा पाहायला मिळणार आहे. या भागात चैतन्यने शोधलेला सगळ्यात मोठा पुरावा अर्जुन कोर्टात सादर करणार आहे. यामध्ये साक्षी आणि महिपत कशाप्रकारे रविराज किल्लेदारला खोटं सांगत असतात याचा खुलासा होणार आहे. तसेच विलासचा खून झाला त्यादिवशी साक्षी नेमकी कुठे होती? मधुभाऊ कसे निर्दोष आहेत हे अर्जुन कोर्टात सांगणार आहे. याशिवाय अर्जुनकडे असणारा सर्वात मोठा पुरावा म्हणजे शिवानी. आता पुढच्या भागात शिवानी भर कोर्टात आपण साक्षीच्या भितीने खोटं बोलल्याचं मान्य करणार आहे.

हेही वाचा : मुनव्वर फारुकीच्या दुसऱ्या लग्नाचा पहिला फोटो आला समोर, दोघांनी केक कापून दिल्या पोज, पाहा PHOTO

अर्जुनने साक्षीविरोधात हे दोन महत्त्वाचे आरोप सिद्ध केल्याने तिची मोठी कोंडी होऊन मधुभाऊंच्या सुटकेचा मार्ग मोकळा होणार आहे. तर, सायलीला या प्रकरणाचा अर्जुन योग्य त्या पद्धतीने छडा लावेल यावर ठाम विश्वास असतो. आता सायलीचे मधुभाऊ सुटणार का? साक्षीने खून केल्याचं नेमकं कधी सिद्ध होणार या गोष्टी मालिकेच्या आागमी भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.