‘बिग बॉस १७’चा विजेता व लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीने गुपचूप दुसरं लग्न उरकलं आहे. मुनव्वरने सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मेहजबीन कोटवाला हिच्याशी निकाह केला आहे. त्यांच्या लग्नाच्या बातम्या मागच्या दोन -तीन दिवसांपासून चर्चेत आहेत. अशातच मुनव्वर व मेहजबीन यांचा पहिला फोटो समोर आला आहे.

मुनव्वरने जवळपास दोन आठवड्यांपूर्वी मेहजबीनशी लग्न केलं. या लग्नाला दोघांच्याही जवळचे नातेवाईक व मित्र-मैत्रिणी उपस्थित होते. मुनव्वरच्या कुटुंबातील एका सदस्याने ‘इंडियन एक्सप्रेस’ शी बोलताना त्यांच्या लग्नाची पुष्टी केली आहे. मेहजबीन कोटवाला ही सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट असून ती मुंबईतील आग्रीपाडा याठिकाणी राहते. या दोघांनी १०० पाहुण्यांच्या उपस्थितीत दोन आठवड्यांपूर्वी लग्न केलं आणि नंतर आयटीसी मराठामध्ये त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन होते, अशी माहिती त्या व्यक्तीने दिली.

घटस्फोटित आहे मुनव्वर फारुकीची दुसरी पत्नी, दिसते खूपच ग्लॅमरस; काय काम करते? जाणून घ्या

मुनव्वर व मेहजबीन यांच्या लग्नाच्या बातम्या येत होत्या, पण त्या दोघांनीही फोटो, व्हिडीओ काहीच सोशल मीडियावर पोस्ट केले नव्हते, त्यामुळे खरंच लग्न झालंय की या निव्वळ अफवा आहेत अशाही चर्चा होत्या. पण आता या दोघांचा एकत्र केक कापतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कुटुंबातील सदस्यांनी लग्नाच्या बातमीवर शिक्कामोर्तब केल्यावर मुनव्वर व मेहजबीन यांचे फोटो समोर आले आहेत. या दोघांनाही लग्न गुपित ठेवायचं होतं त्यामुळे त्यांनी फोटो शेअर केले नव्हते, पण आता त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?

मेहजबीन ही मुनव्वरप्रमाणेच घटस्फोटित असून तिला एक मुलगी आहे, असं म्हटलं जात आहे. व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये मेहजबीनने लॅव्हेंडर कलरचा ड्रेस घातला आहे, तर मुनव्वरने पांढरे शर्ट घातले आहे. एका फोटोत मुनव्वर व मेहजबीन केक कापताना दिसतात, तर दुसऱ्या फोटोमध्ये दोघेही पोज देत आहेत.

“मी आई झाले नाही कारण…”, मूल न होऊ देण्याबद्दल अरुणा इराणींनी सोडलं मौन; म्हणाल्या, “विवाहित पुरुषाशी…”

मुनव्वरने २०१७ मध्ये जास्मिनशी लग्न केलं होतं, या लग्नापासून त्याला एक मुलगाही आहे आणि तो मुनव्वरजवळ राहतो. मुनव्वर आणि जास्मिन काही कारणांमुळे २०२२ मध्ये वेगळे झाले. त्याच्या पहिल्या पत्नीनेही दुसरं लग्न केलं आहे. दरम्यान, ‘बिग बॉस १७’ मध्ये मुनव्वर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत राहिला. या शोमध्ये आयशा खान वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून आली होती. आयशा मुनव्वरची एक्स गर्लफ्रेंड होती व तिने त्याच्यावर फसवणूकीचे आरोप केले होते. त्यापूर्वी मुनव्वर नाझिलाबरोबर रिलेशनशिपमध्ये होता पण त्यांचं ब्रेकअप झालं.