स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सर्वाधिक लोकप्रिय ठरली आहे. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सध्या मालिकेत सायली अर्जुनच्या कॉलेजमधल्या मित्र-मैत्रिणींबरोबर रियुनियन पार्टीला जाते, याचा सीक्वेन्स सुरू आहे. त्या पार्टीला अर्जुनचा मित्र चैतन्य साक्षीला घेऊन येतो आणि तिची ओळख होणारी बायको अशी करून देतो.

सोमवारी (२२ एप्रिल) प्रदर्शित होणाऱ्या एपिसोडचा प्रोमो नुकताच समोर आलाय. नवीन आलेल्या प्रोमोमध्ये सायलीला अर्जुनच्या कॉलेजमधला एक फोटो सापडतो. तो फोटो अर्जुनला दाखवत सायली म्हणते, “सर तुमचा कॉलेजचा फोटो. यात कुणालबरोबर साक्षी का आहे?” सायलीने फोटो दाखवल्यावर अर्जुन दचकून उठतो आणि म्हणतो, “कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती. साक्षीने नाकारल्यामुळे कुणालने आत्महत्या केली होती आणि हीच साक्षी आता चैतन्यच्या मागे लागलीय. मला आता माझ्या आणखी एका मित्राला गमवायचं नाही आहे मिसेस सायली.”

tharala tar mag sayali arjun finds evidence against sakshi
ठरलं तर मग : अर्जुन-चैतन्यमध्ये दिलजमाई! अखेर साक्षीचा खोटेपणा होणार उघड, साखरपुडा मोडणार? पाहा नवीन प्रोमो…
Tharala tar mag promo Chaitanya told sakshi about arjun and sayali contract marriage
ठरलं तर मग: अर्जुन-सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य आलं साक्षीसमोर; चैतन्य खुलासा करत म्हणाला “ते खरे नवरा बायको…”
tharala tar mag sakshi visit subhedar house
ठरलं तर मग : सुभेदारांच्या घरी आली साक्षी! चैतन्य अन् अर्जुनमध्ये होणार जोरदार भांडण, मालिकेत पुढे काय घडणार?
Tharala Tar Mag arjun sayali chaitanya sakshi dance performance at engagement ceremony viral video
VIDEO: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील अर्जुन-सायली आणि चैतन्य-साक्षीने केला साखरपुड्यादिवशी मजेशीर डान्स; चाहते म्हणाले, “वेडे आहात तुम्ही”
tharala tar mag sayali arjun 15 minutes date
‘ठरलं तर मग’ : फक्त १५ मिनिटांची डेट अन् सायली चालवणार स्कूटर, मालिकेचा नवीन प्रोमो पाहिलात का?
Tharala tar mag promo priya tells sayali arjun contract marriage truth to subhedar family
ठरलं तर मग: सुभेदार कुटुंबासमोर प्रिया उघड करणार सायली-अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य? पाहा प्रोमो
aishwarya narkar answer to netizen who troll avinash narkar dance
Video: अविनाश नारकरांचा नेटकऱ्यांना खटकला डान्स, ऐश्वर्या नारकर स्पष्टच म्हणाल्या, “तो…”
Viral Video Watch Farmer Helps Woman Who Had Her Skirt Ripped At Bus Stop Video will win your heart
बापमाणूस! बस स्टॉपवर फाटला तरुणीचा स्कर्ट; मदतीसाठी ‘त्यानं’ पुढे केला हात, पाहा हृदयस्पर्शी VIDEO

हेही वाचा… “तात्या विंचू पुन्हा येतोय!”, आदिनाथ कोठारेने शेअर केलं नव्या सिनेमाचं पोस्टर, अभिनेता म्हणाला…

अर्जुन हताश होऊन अश्रू गाळत हे सगळं सायलीला सांगतो. अर्जुनला खचलेला पाहून सायली त्याला म्हणते, “असं खचून जाऊ नका सर, आपण आताच्या आता चैतन्यला पुराव्यांसकट सगळं सांगूया आणि सगळ्यांसमोर सत्य आणूया.”

एका बाजूला साक्षीने चैतन्यला त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून सत्यापासून वंचित ठेवलंय. साक्षीमुळे अर्जुन आणि चैतन्यच्या मैत्रीमध्येही फूट पडली. चैतन्य आणि अर्जुन पुन्हा एकदा चांगले मित्र व्हावेत याची प्रेक्षक वाट पाहतायत.

हेही वाचा… “आई तू लग्न कधी करणार?”, अरहान खानने मलायका अरोराला प्रश्न विचारताच अभिनेत्री म्हणाली…

चैतन्यला आता तरी साक्षीचा खरा चेहरा कळणार का? साक्षीचं सत्य चैतन्यसमोर आणण्यास अर्जुन आणि सायली यशस्वी होणार का? याचा उलगडा पुढील भागांमध्ये होईल.