‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या विजयादशमीचा सीक्वेन्स सुरू आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. मालिकेच्या गेल्या भागात सायली-अर्जुनच्या नात्याबद्दल निर्माण झालेल्या संशयामुळे अस्मिताने त्यांच्या खोलीत मोबाइल फोन लपवून ठेवल्याचं दाखवण्यात आलं. यानंतर खोलीत लपवलेला फोन कसा व कोणाला सापडला, फोन सापडल्यावर सायली अस्मिताला काय जाब विचारणार? याचा नवीन प्रोमो ‘ठरलं तर मग’च्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा : ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्याच भागात का भावुक झाला करण जोहर? रणवीर-दीपिकासमोर व्यक्त केली खंत

colors marathi announces new marathi serial abeer gulal
नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर
Vishal Nikam and Pooja Birari new serial Yed Lagla Premach start from 27 may
अखेर मुहूर्त ठरला! विशाल निकम व पूजा बिरारीची ‘येड लागलं प्रेमाचं’ नवी मालिका लवकरच होणार सुरू, ‘या’ लोकप्रिय मालिकेची घेणार जागा
colors marathi this serial will go off air
‘कलर्स मराठी’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! कलाकार भावुक, २ वर्षे गाजवलं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य
star pravah man dhaga dhaga jodte nava jogwa fame smita tambe entry
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘जोगवा’ फेम अभिनेत्री घेणार एन्ट्री, साकारणार ‘ही’ भूमिका, जाणून घ्या…

‘ठरलं तर मग’ मालिकेत अस्मिताने सायली-अर्जुनचं भांडं फोडण्यासाठी त्यांच्या रुममध्ये फोन लपवून ठेवलेला असतो पण, सायलीच्या हुशारीमुळे तो फोन तिला आधीच सापडतो. सायली सगळे व्हिडीओ डिलीट करून फोन आहे त्या जागी ठेऊन देते. अस्मिता पुन्हा मोबाइल चेक करून पाहते तेव्हा तिला एकही व्हिडीओ सापडत नाही. त्यामुळे ती अस्वस्थ होऊन प्रियाला फोन करते आणि घडला प्रकार सांगते. हे प्रेक्षकांना आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : ‘बॉईज ४’ चित्रपटाबद्दल काय आहे प्रिया बेर्डेंची प्रतिक्रिया? लेक अभिनय बेर्डेच्या कामाबद्दल म्हणाल्या, “त्याची भूमिका…”

आता सायली अस्मिताला कशी अद्दल घडवणार? याचा नवीन प्रोमो समोर आला आहे. सायली अस्मिताच्या खोलीत स्वत:चा मोबाइल लपवते आणि अस्मिता खोलीत असतानाच तो घ्यायला जाते. यावर अस्मिता भडकते…नणंदेचा चेहरा पाहून सायली तिला विचारते, तुम्ही आमच्या खोलीत काय पाहण्यासाठी मोबाइल लपवला? तसाच मी तुमच्या खोलीत माझा मोबाइल लपवला तर काय बिघडलं अस्मिता ताई? असा जाब तिला विचारते.

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…

सायलीचे प्रश्न ऐकून अस्मिता निरुत्तर झाल्याचं नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. सायली-अस्मितामध्ये झालेलं बोलणं अर्जुन चोरून दरवाज्याच्या बाहेरुन ऐकत असतो. सायलीच्या हुशारीचं त्याला मनोमन कौतुक वाटत असतं. आता अस्मिताने केलेली चूक सायली सर्वांसमोर उघडी पाडणार की, तिला माफ करणार? हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळणार आहे. तसेच येणाऱ्या काही भागांमध्ये सायली गरोदर असल्याचा गैरसमज सुभेदारांच्या मनात निर्माण होणार असल्याचा ट्रॅक मालिकेत सुरू होणार आहे.