‘कॉफी विथ करण’च्या आठव्या सीझनमध्ये पहिल्याच भागात बॉलीवूडची स्टार जोडी रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. यावेळी रणवीर-दीपिकाने करण जोहरसमोर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले. दोघांनीही २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रामलीला’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं. साधारण २०१२ पासून आम्ही एकमेकांना डेट करायला सुरूवात केली असं ‘कॉफी विथ करण’मध्ये दीपिकाने सांगितलं.

हेही वाचा : ‘बॉईज ४’ चित्रपटाबद्दल काय आहे प्रिया बेर्डेंची प्रतिक्रिया? लेक अभिनय बेर्डेच्या कामाबद्दल म्हणाल्या, “त्याची भूमिका…”

Puppy beaten, Pimpri,
Video : पिंपरीत श्वानाच्या पिल्लाला बेदम मारहाण; गुन्हा दाखल, मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Big falls in Sensex and Nifty
सेन्सेक्स अन् निफ्टीत मोठ्या प्रमाणात पडझड; शेअर बाजाराच्या घसरणीला ‘या’ तीन गोष्टी ठरल्या कारणीभूत
Dead ants found in samosas
किळसवाणा प्रकार! कुरकुरीत समोस्यामध्ये आढळल्या मेलेल्या मुंग्या; दिल्ली विद्यापीठाच्या कॅन्टीनमधील Video Viral

२०१२ ते २०१५ या काळात एकमेकांना डेट केल्यावर रणवीरने मालदिवमध्ये दीपिकाला लग्नासाठी मागणी घालत गुपचूप साखरपुडा उरकला होता. यानंतर दोघांनी बंगळुरूला येऊन दीपिकाचे वडील प्रकाश पदुकोण यांची भेट घेतली होती. ६ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अखेर १४ नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर-दीपिकाने इटलीमधील लेक कोमो येथे जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत थाटामाटात लग्न केलं.

हेही वाचा : ‘या’ अभिनेत्रीने ‘रामलीला’ सोडल्याने लागलेली दीपिका पदुकोणची वर्णी, रणवीर सिंह खुलासा करत म्हणाला…

रणवीर-दीपिकाच्या लग्नात नातेवाईकांना मोबाइल वापरण्यास निर्बंध असल्याने त्यांच्या लग्नातील कोणतेच व्हिडीओ किंवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले नव्हते. अखेर लग्नानंतर ५ वर्षांनी दोघांनीही ‘कॉफी विथ करण’मध्ये त्यांच्या लग्नातील खास व्हिडीओ शेअर केला आहे. रणवीर-दीपिकाच्या लग्नातील सगळे विधी, दोघांचा पारंपरिक लूक आणि कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांची झलक या Unseen व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

रणवीर-दीपिकाच्या लग्नातील हा खास व्हिडीओ पाहून करण जोहर प्रचंड भावुक झाल्याचं ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या एपिसोडमध्ये पाहायला मिळालं. त्याने आयुष्यात एकटा असल्याची खंत दोघांसमोर व्यक्त केली. करण म्हणाला, “मी सध्या कोणाबरोबरही रिलेशनशिपमध्ये नाही…सिंगल आहे. आता हा व्हिडीओ पाहून मी आयुष्यात काय मिस करतोय याची जाणीव मला झाली. रिलेशनशिपमध्ये राहणं नक्कीच कठीण असतं पण, आयुष्यातील कठीण प्रसंगात तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर असणं खूप महत्त्वाचं असतं. मी तुमच्यासाठी खूप आनंदी आहे. माझ्या शोमध्ये मी एवढा भावुक केव्हाच झालो नव्हतो. तुमचं हे प्रेम पाहून माझं पोटं भरलं असं मी म्हणेन.” करणची प्रतिक्रिया ऐकून रणवीर-दीपिका त्याला जवळ घेत आधार देतात आणि आम्ही कायम तुझ्याबरोबर आहोत असं सांगतात.

हेही वाचा : “रिंकू राजगुरु ‘झिम्मा २’ची मज्जा घालवणार नाही ना?” चाहत्याच्या कमेंटवर सिद्धार्थ चांदेकरची प्रतिक्रिया, म्हणाला…

दरम्यान, ‘कॉफी विथ करण’च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून चांगला मिळाला असून या शोमधील रणवीर-दीपिकाने सांगितलेले बरेच किस्से सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.