टीआरपीमध्ये आघाडीवर असणारी स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीय. आताच्या घडीला ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. या मालिकेमध्ये सध्या अर्जुन आणि सायली साक्षीविरोधात पुरावे गोळा करतात, असा सीक्वेन्स सुरू आहे. लवकरच या मालिकेत मोठा ट्विस्ट येणार आहे.

मधूूभाऊंवर साक्षीने केलेल्या खुनाचा आरोप असल्याने अर्जुन, सायली व चैतन्य हे साक्षीविरोधात पुरावे गोळा करीत असतात. याआधी सुनावणीच्या वेळेस शिवानीने कोर्टात साक्षीकडून पैसे घेऊन, तिच्या बाजूने साक्ष दिलेली असते. शिवानीने गरजेपोटी हे सगळं केलेलं असतं आणि मधूभाऊंची सुटका लवकर व्हावी यासाठी सायली शिवानीच्या घरी जाऊन तिला खरं बोलण्यास तयार करते आणि सायली शिवानीला सुभेदारांच्या घरी घेऊन येते. सायली सुभेदार कुटुंबाशी शिवानीची ओळख तिची आश्रमातली मैत्रीण, अशी करून देते आणि तिला एक रात्र या घरी थांबू द्यावं, अशी परवानगी सुभेदार कुटुंबाकडे मागते.

Tharla tar mag new promo purnaaji see pratima appearance in sayali, priyas plan to dominate raviraj fails
ठरलं तर मग: पूर्णाआजीला सायलीमध्ये दिसणार प्रतिमाचं रूप! मालिकेत येणार नवा ट्विस्ट, पाहा प्रोमो
tharala tar mag fame actress jui gadkari
“मालिकेत सायलीला रडवणारी साक्षी…”, ‘ठरलं तर मग’ फेम जुई गडकरीच्या ‘त्या’ पोस्टने वेधलं लक्ष
Tharla tar mag new promo arjun sayali chaitanya will find new proof against sakshi in vilas murder case via video recording
ठरलं तर मग: व्हिडीओ रेकॉर्डिंग होणार सुरू अन् मिळणार साक्षीविरोधात नवा पुरावा; चैतन्य खेळणार नवी खेळी, पाहा प्रोमो
Tharala tar mag fame Chaitanya Sardeshpande and Ketki Palav dance on Shahrukh khan and Madhuri dixit song dholana
Video: ‘ठरलं तर मग’ मालिकेतील चैतन्य व साक्षीचा शाहरुख-माधुरीच्या ‘या’ लोकप्रिय गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हिडीओ
tharala tar mag serial mahasaptah arjun sayali finds big evidence
ठरलं तर मग : अर्जुनच्या हाती लागला मोठा पुरावा, साक्षीचा डाव फसणार? सुरू होतोय मालिकेचा महासप्ताह, पाहा प्रोमो
tharala tar mag arjun got big evidence to trap sakshi and mahipat
‘ठरलं तर मग’मध्ये कोर्टरुम ड्रामा! ‘त्या’ व्हिडीओमुळे सिद्ध होणार साक्षीचा खोटेपणा; अर्जुनकडे आहेत ‘हे’ पुरावे, पाहा प्रोमो
Man Dhaga Dhaga Jodte Nava Marathi Serial taking 6 years leap new promo out
Video: “आनंदी कुठे गेली?”, ‘मन धागा धागा जोडते नवा’चा प्रोमो पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया, मालिका घेणार ६ वर्षांचा लीप
Saregamapa Little Champs fame Rucha Ghangrekar sing tharala tar mag serial title song
Video: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ फेम ऋचा घांगरेकरने गायलं ‘ठरलं तर मग’ मालिकेचं शीर्षकगीत, नेटकऱ्यांकडून होतंय कौतुक

हेही वाचा… अवनीत कौरने केला साखरपुडा? अभिनेत्रीच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण

आता ठरलं तर मालिकेचा (१ जूनचा) नवा प्रोमो नुकताच समोर आलाय. नव्या प्रोमोमध्ये कोर्टात साक्षीची सुनावणी होणार असते. त्यासाठी सायली, अर्जुन हे शिवानीसह कोर्टात पोहोचतात. कोर्टात सुनावणी सुरू होताच अर्जुन शिवानीची साक्ष घेतो. अर्जुन शिवानीला विचारतो, “जे काही घडलं होतं ते खरं खरं कोर्टाला सांगा.”

त्यावर शिवानी म्हणते, “मी साक्षीमॅडमच्या बाजूने जी साक्ष दिली होती, ती पूर्णपणे खोटी होती. साक्षीमॅडमनी खोटी साक्ष देण्यासाठी पैसे दिले होते.”

हेही वाचा… गश्मीर महाजनीला मिळते अक्षय कुमारकडून प्रेरणा; अभिनेता म्हणाला, “मी दररोज…”

शिवानीची साक्ष देऊन झाल्यावर अर्जुन कोर्टाला सांगतो, “याचाच अर्थ मिस साक्षी शिखरे यांनीच विलासचा खून केलाय ही शक्यता नाकारता येत नाही.” शिवानीची साक्ष ऐकताच साक्षीला आश्चर्याचा धक्का बसतो.

शिवानीने दिलेली साक्ष आता कोर्टासमोर तर आलीच आहे; परंतु चैतन्यने साक्षीविरोधात गोळा केलेले पुरावेदेखील अर्जुन कोर्टात सादर करणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

हेही वाचा… पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणच्या लग्नाला तीन महिने पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “मिसेस झाल्यानंतर…”

दरम्यान, शिवानीने दिलेल्या साक्षीमुळे साक्षीला कायमचा तुरुंगवास होणार का? की आताही साक्षी काहीतरी युक्ती करून तिची सुटका करून घेईल? हे येत्या भागांमध्ये स्पष्ट होईल.