मराठमोळा अभिनेता गश्मीर महाजनी लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये दिसणार आहे. ‘खतरों के खिलाडी १४’च्या सीजनची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहतायत. काही दिवसांपूर्वीच या शोमधील स्पर्धकांची नावं जाहीर झाली आणि त्यातलेच एक नाव म्हणजे गश्मीर महाजनी.

गश्मीरने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपलं स्थान निर्माण केलंय. या अभिनेत्याची आता ‘खतरों के खिलाडी’ च्या १४ व्या सीजनमध्ये वर्णी लागली आहे. बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारकडून गश्मीरला प्रेरणा मिळते, असं त्यानं एका मुलाखतीत सांगितलंय.

mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
Gurucharan Singh on being missing
“मला हा निर्णय…”, २६ दिवस बेपत्ता होण्याबद्दल गुरुचरण सिंगने सोडलं मौन; कायदेशीर बाबींचा उल्लेख करत म्हणाला…
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
tina ambani, Shloka Ambani and radhika merchant these ambani daughter in law are older than husband
अंबानी कुटुंबातील ‘या’ सूना पतीपेक्षा वयाने आहेत मोठ्या; होणारी सून राधिका मर्चंट ३० वर्षांची तर अनंत…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Fahadh Faasil diagnosed with ADHD
दाक्षिणात्य सुपरस्टार फहाद फासिलला गंभीर आजाराचं निदान, म्हणाला, “४१ व्या वर्षी…”

हेही वाचा… पूजा सावंत-सिद्धेश चव्हाणच्या लग्नाला तीन महिने पूर्ण, अभिनेत्रीने शेअर केली खास पोस्ट; म्हणाली, “मिसेस झाल्यानंतर…”

अक्षय कुमारप्रमाणेच गश्मीर त्याच्या आरोग्याची काळजी घेतो. ‘खतरों के खिलाडी १४’मधील प्रवास सुरू होण्यापूर्वी गश्मीरने हे नमूद केले की, त्याला अक्षय कुमारकडून प्रेरणा मिळते.

गश्मीरच्या दिनचर्येतील सर्वांत उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे त्याची दिवसाची सुरुवात. तो रोज पहाटे ४ वाजता उठतो आणि पहाटेची शांतता स्वीकारून दिवसाची सुरुवात करतो. ही शिस्त त्याला केवळ सुरुवातच देत नाही, तर त्याला त्याच्या दैनंदिन वेळापत्रकात विविध आरोग्यदायी सवयींचा समावेश करण्यास अनुमती देते.

‘पिंकविला’ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर म्हणाला, “मला असं वाटत की, तुम्ही दिवसाची सुरुवात कशी करता यावर पूर्ण दिवस अवलंबून असतो. मी दररोज पहाटे ४ वाजता उठतो, लवकर उठल्यानं दिवसभराच्या धावपळीसाठी माझ्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यास मला वेळ मिळतो.”

हेही वाचा… ‘हीरामंडी’ फेम ताहा शाह करतोय प्रतिभा रांताला डेट? अभिनेता म्हणाला, “मी प्रेमपत्र…”

गश्मीर पुढे म्हणाला, “माझ्या फिटनेस पद्धतीमध्ये वर्कआउट, योगा व ध्यान यांचा समावेश असतो. त्यामुळे मला चपळता मिळते. मला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतील याची खात्री करण्यासाठी माझ्या आहाराचं मी काटेकोरपणे नियोजन केलं आहे. शिस्तबद्ध असणं ही प्रत्येक गोष्टीची गुरुकिल्ली आहे.”

गश्मीरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर हा अभिनेता नुकताच स्टार प्लस या वाहिनीवरील इमली या मालिकेमध्ये झळकला होता. गश्मीरनं या मालिकेत आदित्य कुमार त्रिपाठीची भूमिका साकारली होती. याआधी गश्मीरनं पानिपत, धर्मवीर, बोनस अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलंय.

हेही वाचा… शाहिद कपूर आणि मीरा कपूर यांनी खरेदी केलं तब्बल इतक्या कोटींचं अपार्टमेंट; किंमत वाचून व्हाल थक्क

दरम्यान, ‘खतरों के खिलाडी १४’चा क्रू शोच्या शूटिंगसाठी नवीन ठिकाणी पोहोचला आहे. या सीजनचं चित्रीकरण रोमानियामध्ये होणार आहे आणि या शोचं शूट सुरूदेखील झालं आहे.