रेश्मा राईकवार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मसान’,‘गँग्ज ऑफ वासेपूर’सारख्या निवडक चित्रपटांपासूनच अभिनेत्री रिचा चढ्ढाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. चित्रपट निवडीच्या बाबतीत ती आजही तितकाच विचारपूर्वक निर्णय घेते. आशय-विषयातले नावीन्य हा तिच्यासाठी महत्त्वाचा निकष आहे, असं ती म्हणते. मात्र एकंदरीतच हा काळ कलाकारांसाठी खूप सर्जनशील आहे. कारण चित्रपट, वेबपट, वेबमालिका, पॉडकास्ट अशी वेगवेगळी माध्यमे कलाकारांना अभिव्यक्तीसाठी उपलब्ध आहेत, असे सांगणाऱ्या रिचाची ‘कँडी’ ही नवीन वेबमालिका वूटवर प्रदर्शित झाली आहे.

‘कँ डी’ या वेबमालिके ची कथा रहस्यमय आहे. उत्तर भारतात रुद्राकुं डसारख्या थंड हवेच्या ठिकाणी एक खून होतो. या खुनाचा तपास करताना अमली पदार्थांची तस्करी, शाळेतील मुलांचा त्यातला सहभाग अशा विविध गोष्टींचा वेध यातून घेण्यात आला आहे. रिचाने याआधीही वेबमालिके त काम के लं आहे. ‘इनसाईड एज’सारख्या वेबमालिके त काम के लं तेव्हा अनेकांनी चित्रपटातून वेबमालिका म्हणजे कलाकाराची कारकीर्दच संपली, अशा पद्धतीची टीका के ली होती. मात्र तसं काही झालं नाही, उलट ओटीटी माध्यमांचा अधिकच विस्तार झाला आहे, असं ती म्हणते.

ओटीटी हे प्रेक्षकांसाठी करोनाच्या कठीण काळात जगभरातला आशय पाहण्यासाठीचं एक महत्त्वाचं आणि सोईचं माध्यम ठरलं आहे, असं तिला वाटतं. करोना काळात लोक घरी असल्याने ते काही ना काही बघणारच. चित्रपट नसतील तर मनोरंजनासाठी ते काहीतरी शोधणार हे साहजिक आहे. त्यामुळे ओटीटीच्या माध्यमातून त्यांना घरबसल्या हवा तो आशय पाहता येतो आहे. माझे चित्रपट मधल्या काळात चित्रपटगृहातून प्रदर्शित झाले खरे…पण त्यावेळी चित्रपटगृहांमध्ये ३० टक्के किंवा ५० टक्के  प्रेक्षकसंख्येलाच परवानगी होती. तरीही  चित्रपटगृहातून चित्रपट प्रदर्शित होणं गरजेचं होतं. तिथे तिकिटबारीवर चित्रपट किती कमाई करतो आहे हा विचार नव्हता, तर चित्रपटगृहातून प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाच्या ओटीटी आणि अन्य प्रदर्शनाचा मार्ग सुकर होतो हे गणित त्यामागे होतं, असं ती म्हणते.

तंत्रज्ञानामुळे कलाकारांना हा सर्जनशील काळ अनुभवायला मिळत असल्याचं तिने सांगितलं. कलाकाराला काम करत राहणं गरजेचं आहे. शेवटी अभिनय हीसुद्धा सरावाने विकसित होत जाणारी कला आहे. मग तुम्ही चित्रपटात काम करा किं वा रंगभूमीवर काम करा. स्वत:साठी एखादं नाटक वा चित्रपट लिहा. स्वरूप काहीही असलं तरी कलेच्या क्षेत्रात सतत काहीतरी करत राहणं महत्त्वाचं आहे. सध्या तंत्रज्ञानातील बदलामुळे आशय – विषयात प्रयोग करत राहणं हे चित्रपटकर्मींना आणि कलाकारांनाही शक्य झालं आहे. पहिले तसं काही करता येत नव्हतं. चित्रपट एके  चित्रपट एवढाच कामाचा परीघ होता. हल्लीच मी आणि अली फजलने मिळून एक पॉडकास्ट के लं. या त्याच त्याच पठडीतल्या गोष्टी नाहीत, असं रिचा सांगते. रिचा समाजमाध्यमांवरून आपली मतं मांडण्यातही कायम आघाडीवर राहिली आहे. तिला मात्र यात वेगळं वाटत नाही. ‘कलाकाराच्या सांगण्याला महत्त्व असतं, कारण ते लोकांच्या चटकन लक्षात येतं. यापलीकडे फारसा फरक आता पडत नाही, कारण समाजमाध्यमांमुळे आता सर्वसामान्य माणूसही आपले विचार, आवडीनिवडी याबद्दल जाहीरपणे व्यक्त होऊ लागला आहे. एखाद्या उपाहारगृहातला पदार्थ नाही आवडला इथपासून ते एखादं नवं पुस्तक कं टाळवाणं आहे किं वा अमुक एक घडलेली घटना मान्य नाही अशा कु ठल्याही मुद्यांवर सर्वसामान्य माणूसही रोज व्यक्त होत असतो. कलाकारही त्याला अपवाद नाहीत, कारण तेही या समाजाचाच भाग आहेत’, असं ती म्हणते.

एकीकडे चित्रपट – वेबमालिकात व्यग्र असताना तिने आणि अलीने मिळून स्वत:च्या चित्रपटनिर्मितीच्या संस्थेची घोषणा केली आहे. या निर्मितीसंस्थेंतर्गत त्यांनी नुकतीच ‘गल्र्स विल बी गल्र्स’ या पहिल्याच चित्रपटाची घोषणा के ली आहे. इंडो – फ्रेंच संयुक्तरीत्या निर्मिती होत असलेल्या या चित्रपटात आम्ही दोघंही काम करणार नाही आहोत, असं ती म्हणते. शुचि तलाती यांची पटकथा आणि दिग्दर्शन असणार आहे. ‘बर्लिनाले २०२१ स्क्रिप्ट स्टेशन’मध्ये निवडली गेलेली ही एकमेव भारतीय पटकथा असून यात हिमालयातील एका छोट्याशा खेड्यात राहणारी मुलगी आणि तिच्या आईच्या नात्याची गोष्ट आहे, अशी माहिती रिचाने दिली. नवनवीन कथा या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा आपला प्रयत्न असल्याचं तिने सांगितलं. टाळेबंदीत जो वेळ मिळाला त्यात पटकथा लेखनही सुरू के लं असल्याचं तिने सांगितलं.

करोनामुळे सगळं जगच बदललं आहे. बदल सगळ्यांच्याच आयुष्यात होतो आहे तसा मनोरंजन क्षेत्रातही बदल होतो आहे आणि कलाकारांना त्या बदलांशी जुळवून घेणं गरजेचं आहे, असं ती म्हणते. सध्या वेगवेगळ्या प्रांतातील कथा मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतायेत. मात्र हिंदी चित्रपटातून त्या सातत्याने दाखवण्यात आल्या आहेत. अगदी ‘बंटी और बबली’सारखा तद्दन व्यावसायिक चित्रपट त्याचे उदाहरण म्हणून घेता येईल, असं ती सांगते. उत्तर प्रदेश, के रळ, गुजरात, काश्मीर अशा वेगवेगळ्या प्रदेशातील कथा चित्रपटातून आपण पाहिलेल्या आहेत. प्रत्येक लेखक – दिग्दर्शक तो जिथून आला आहे तिथल्या गोष्टी सांगण्याबाबत आग्रही असतो. त्यामुळे ओटीटी किं वा चित्रपट अशा विविध माध्यमांतून आपल्या देशातल्या नानाविध प्रांतातल्या गोष्टींचं चित्रण मोठ्या प्रमाणावर दिसतं आहे, असं मत तिने व्यक्त के लं. रिचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आपला आदर्श मानते. ‘सेक्शन ३७५’ चित्रपटाच्या निमित्ताने मी बाबासाहेबांचं लेखन वाचलं, त्यांच्याविषयी अनेक पुस्तकं  वाचली. आपल्याला फक्त ते घटनेचे शिल्पकार म्हणून माहिती आहेत, मात्र त्यापलीकडे अफाट, अचाट असं त्यांचं व्यक्तिमत्त्व आहे, प्रगाढ अभ्यास आहे. त्यांचे विचार आजच्या काळातही आपल्याला मार्गदर्शक वाटतात, असं तिने सांगितलं. कलेच्या दृष्टीने अत्यंत सर्जनशील अशा या वातावरणात कलाकार म्हणून आपला परीघ वाढवत नेण्यावरच आपला भर राहणार असल्याचेही तिने यावेळी स्पष्ट के ले.

 वेबमालिका कलाकारांसाठी खूप उपयुक्त ठरतात. कारण एका वेबमालिके तून त्यांना अनेक भागांपर्यंत आपली व्यक्तिरेखा जगता येते. नवनव्या पर्वाबरोबर आपल्या व्यक्तिरेखेचा नव्याने शोध घेता येतो. मला चित्रपट करायचे नाहीत असं नाही, पण वेबमालिका करण्यातही मला मजा येते. त्याचाही एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे जो आत्तापर्यंत अमेरिकन शोज पाहत होता. त्यांना सासू-सूनेचं रोजचं दळण असलेल्या मालिका पाहायच्या नव्हत्या. ते चांगल्या भारतीय आशयाच्या शोधात होते आणि तिथे ‘कँ डी’सारख्या वेबमालिका चपखल बसतात.

रिचा चढ्ढा

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Terms of film selection creative time for artists akp
First published on: 26-09-2021 at 00:04 IST