‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ हा शो एकेकाळी सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो होता. या कार्यक्रमाने अनेक प्रसिद्ध विनोदवीर मनोरंजन विश्वाला दिलेत. जवळपास ९ वर्षांनी हा शो नव्या रुपात पुन्हा छोट्या पडद्यावर दाखल झाला खरा पण त्याला पाहिजे तशी प्रेक्षकांची पसंती मिळाली नाही. या कार्यक्रमाचे प्रशिक्षक जाकिर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलाल यांना या शोमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या तिघांची जागा आता श्रेयस तळपदे आणि साजिद खान घेणार असल्याचे म्हटले जात आहे.टीव्हीवर प्रेक्षकांना आकर्षित करायचे असेल तर स्टार्सना आणणे महत्त्वाचे असल्याचे निर्मात्यांना लक्षात आले. म्हणूनच त्यांनी आता या शोमध्ये काही बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हे तीनही परीक्षक युट्यूबवर फार प्रसिद्ध आहेत. पण त्यांचे हे फेम टीव्हीवर मात्र फार दिसू शकले नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना साजिद म्हणाला की, मूळ कार्यक्रमाला याच पद्धतीने तयार करण्यात आले होते. या तिघांना योग्य स्पर्धकांची निवड करुन देणे एवढेच काम होते. आता मला आणि श्रेयसला अक्षयसोबत हा कार्यक्रम पुढे न्यायचा आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आम्ही ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’च्या टीमला भेटू आणि चित्रीकरणाला सुरूवात करु.

या कार्यक्रमाबद्दल बोलताना अश्विनी यार्दीने सांगितले की, देशभरात ऑडिशन केल्यानंतर आता खऱ्या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. या प्रवासात आम्ही जाकिर खान, मल्लिका दुआ आणि हुसैन दलाल या तिघांचेही आभारी आहोत. आता याच्यापुढचा प्रवास साजिद खान आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत करणार आहोत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The great indian laughter challenge judges mallika dua hussain dalal and zakir khan to be replaced by sajid khan and shreyas talpade
First published on: 16-10-2017 at 18:18 IST