हॉलीवूड अभिनेता मार्क रुफेलो ‘अॅव्हेंजर’ चित्रपटातील ‘हल्क’ या सुपरहिरोच्या भूमिकेसाठी प्रसिद्ध आहे. पण हा हॉलीवूड अभिनेता जरी न्यू यॉर्कचा असला तरी आपण बिहारचेही असल्याचे म्हणतोय.
मार्कने नुकताचं ट्विटरद्वारे सोलार बिहार प्रोजेक्टला आपला पाठींबा दर्शविला आहे. ‘मी १००% न्यू यॉर्कचा आहे, पण मी १००% बिहारचासुद्धा आहे #SolarBihar,’ असे मार्कने ट्विट केला होते. हे ट्विट बॉलीवूड अभिनेत्री अदिती राव हैद्रीने रिट्विट केले. त्यामुळे केवळ भारतीयांचाच नाही तर हॉलीवूडचाही सोलार प्रोजेक्टला पाठींबा मिळताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


बॉलीवूड सेलिब्रिटी मनोज बाजपेयी, संजय मिश्रा, विनय पाठक, स्वरा भास्कर, मियाँग चँग, नीतू चंद्रा यांनीदेखील सदर प्रोजेक्टसाठी पुढाकार घेतला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The hulk mark rufallo saying he is 100 percent bihar
First published on: 31-08-2015 at 09:55 IST