‘वस्त्रहरण’ या नाटकाद्वारे व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविणारे नाटककार मच्छिंद्र कांबळी यांची आज पुण्यतिथी. ४ एप्रिल १९४७ साली मालवणात जन्म घेणाऱ्या या मालवणी नाटककाराचं ३० सप्टेंबर २००७ साली निधन झालं. मराठी रंगभूमीला पोरकं करुन गेलेला हा कलाकार आजही प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करुन आहे.

अस्सल मालवणी बोलीतले ‘वस्त्रहरण’ हे नाटक मैलाचा दगड ठरले आहे. या नाटकामध्ये कांबळी यांनी वठविलेली तात्या सरपंच यांची भूमिका ते खऱ्या अर्थाने जगले. विशेष म्हणजे या नाटकाने तुफान लोकप्रिया मिळविली. इतकचं नाही तर या नाटकाचे ४ हजार८९९ प्रयोग सादर झाले. त्यानंतर ‘पांडगो इलो रे’ , ‘घास रे रामा’ , ‘वय वर्ष पंचावन्न’ , ‘भैय्या हातपाय पसरी’, ‘येवा कोकण आपलाच असा’, ‘माझा पती छत्रीपती’ अशी अनेक नाटके त्यांनी आपल्या भद्रकाली प्रोडक्शन या नाटयसंस्थेमार्फत अनेक वर्ष चालवली.

कांबळी यांच्या अभिनयामुळे गाजलेल्या या नाटकाने केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही नावलौकिक मिळविला. हे नाटक लंडनमध्ये सादर करण्यात आलं. विशेष म्हणजे सातासमुद्रापार सादर होणाऱ्या पहिल्या मालवणी नाटकाचा मान ‘वस्त्रहरणा’ला मिळालं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भद्रकाली प्रॉडक्शनने एकूण ५० च्या वर मराठी रंगभूमीला नाटके दिली असून मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर भद्रकालीची सूत्रे कविता कांबळी आणि प्रसाद कांबळी यांनी हाती घेतली. त्यामुळे भद्रकालीच्या रूढ परंपरेला छेद देत, या संस्थेने अतिशय वेगळे, चाकोरीबाहेरचे नाटक रंगभूमीवर आणले.