शाहरुख खान आणि काजोल म्हणजे बॉलिवूडमधील गाजलेल्या जोड्यांपैकी एक. दोघांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्यामधील एक चित्रपट आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने पाहतात तो म्हणजे ‘कुछ कुछ होता है’. चित्रपट प्रदर्शित होऊन आज 20 वर्ष पूर्ण झाली आहेत. पण आजही चित्रपटातील गाणी तरुणाई गुणगुणताना दिसते. शाहरुख, काजोल आणि राणी मुखर्जी या तिघांचा अभिनयही प्रेक्षकांना तितकाच आवडला होता. काजोलने साकारलेली भूमिका तिच्या करिअरमधील सर्वोत्तमपैकी एक असल्याचं म्हटलं जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिग्दर्शक म्हणून करण जोहरचा हा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटातून करण जोहरने बॉलिवडूमध्ये यशस्वी पदार्पण केलं. दरम्यान चाहत्यांसाठी करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’ चा सिक्वल आणण्याचे संकेत दिले आहेत. 1998 मधील या सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलमध्ये रणबीर कपूर, आलिया आणि जान्हवी कपूर झळकण्याची शक्यता आहे.

याबद्दल एका मुलाखतीत विचारलं असता काजोलने मला माहित आहे की ती जादू ते पुन्हा करु शकत नाहीत. ते अशक्य आहे अशी प्रतीक्रिया दिली आहे.

यावेळी चित्रपटाच्या आठवणीही काजोलने शेअर केल्या. काजोलने सांगितलं की, ‘आम्ही शुटिंगसाठी उटीला गेला होतो. आम्ही तेथे नुकत्याच उभारण्यात आलेल्या एका हॉटेलमध्ये राहिलो. त्या हॉटेलमध्ये राहणारे आम्ही पहिलेच होतो. आम्ही जवळपास ४० दिवसांसाठी तिथे होतो. खोऱ्याच्या मधोमध त्यांनी तो सेट कसा उभारला याचा मी विचारही करु शकत नाही. त्यांनी घऱाचा, समर कॅम्प सेट उभा केला होता. तो जबरदस्त अनुभव होता. मला यश जोहरदेखील आठवतायत. चित्रपटाच्या आठवणींपैकी ते एक आहेत. जे काही सर्व सुरु होतं त्यामागे त्यांचाच पाठिंबा होता’.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: They cant recreate magic says kajol on kuch kuch hota hai sequel
First published on: 16-10-2018 at 13:20 IST