भारतीय ग्लॅमर दुनियेचा चेहरा-मोहरा गेल्या अनेक वर्षांत झपाट्याने बदलला आहे. खास करून या क्षेत्रातील बऱ्याच स्त्री मॉडेल्स उतरत्या वयातदेखील स्वत:च्या फिटनेसबाबत कमालीच्या जागरूक असल्याचे पाहायला मिळते. योग्य आहारासोबतच जीममध्ये व्यायाम करून त्या फिटनेस जपतात. त्याचबरोबर योगा करून शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यदेखील जपतात. कित्येक मॉडेल्स त्यांच्या वयापेक्षा तरूण दिसतात. ऐन तारुण्यात रॅम्पवरील आपल्या सौंदर्याने फॅशन जगतावर राज्य करणाऱ्या या तिशी पार केलेल्या सुंदऱ्या आजही तितक्याच आकर्षक, फिट आणि सुंदर दिसतात. तारुण्यात मेकअप आणि फॅशनेबल कपडे परिधान करून कोणीही सुंदर दिसेल. परंतु, वाढत्या वयाबरोबर तोच उत्साह आणि फिटनेस टिकवून ठेवणे कठीण असते. या सुंदऱ्यांनी ते साध्य केले आहे. वाढत्या वयातील त्यांचा फॅशन सेन्स वाखाणण्याजोगा असून, त्यांनी परिधान केलेले फॅशनेबल कपडे आणि त्यांची स्टाईल आजच्या युवतींना आकर्षित करते. तरुणींना लाजवेल असा फिटनेस, उत्साह आणि सौंदर्य लाभलेल्या अशाच काही तिशीपार मॉडेल्स –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लिसा रे –
लिसाचे वय ४५ वर्षे असून ती विशीपार किंवा तिशीतील दिसते. ग्रे रंगाचा टॉप आणि पॅण्ट परिधान केलेली लिसा तिच्या वयापेक्षा खूपच तरूण वाटते. अनेक तरुणींसाठी हा ग्लॅमरस लूक कॅरी करणे तशी कठीण बाब आहे. परंतु या वयातदेखील लिसा या लूकमध्ये कमालीची ग्लॅमरस दिसते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thirty something models who are slaying fashion industry like any 20 year old model
First published on: 26-07-2017 at 18:48 IST