‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री नुशरत भरुचा सध्या तिच्या आगामी ‘ड्रीम गर्ल’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात ती आयुषमान खुरानासोबत रोमान्स करताना दिसणार आहे. प्रमोशननिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत नुशरतने तिच्यासोबत घडलेला एक मजेशीर किस्सा सांगितला.
‘स्पॉटबॉय ई’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत नुशरतने तिला आलेला विचित्र व हास्यास्पद अनुभव सांगितला. ”मी एकदा चुकून पुरुषांच्या टॉयलेटमध्ये गेले होते. पण बरं झालं की आत कोणीच नव्हतं. मी लगेचच धावत बाहेर आले. बरं झालं त्यावेळी आत कोणी नव्हतं आणि बाहेरूनही कोणी आत आलं नाही. नाहीतर सर्वांसमोर माझी फजिती झाली असती.”
Phots : सुनील शेट्टीचा मुलगा अहान या मॉडेलला करतोय डेट
”आजकाल टॉयलेटच्या दरवाजावर दाखवल्या जाणाऱ्या पुरुष व स्त्रियांच्या चिन्हांमध्ये बरीच कल्पकता वापरली जाते. त्यामुळे कोणतं पुरुषांचं व कोणतं महिलांचं तेच समजत नाही. खूपच कल्पकता वापरली की सामान्यांचा गोंधळ उडतो,” असं ती पुढे म्हणाली.
‘आर्ची’इतकीच सुंदर आहे तिची आई; पाहा फोटो
नुशरत व आयुषमानचा ‘ड्रीम गर्ल’ हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचं लक्ष वेधलं असून प्रदर्शनाबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी केली असून चित्रपटाचे दिग्दर्शन राज शांडिल्य करत आहेत.