‘जेम्स बॉण्ड’ म्हटलं की आपल्या समोर काय येतं? त्याच्या महागड्या गाड्या आणि त्यावरील जबरदस्त अॅक्शन सीन्स. जेम्स बॉण्डचे अॅक्शन सीन्स पाहून आपण थक्क होतो. असं वाटतं की बॉण्ड किती नशीबवान आहे. त्याला जगातील अत्यंत महागड्या गाड्यांमधून फिरता येते. शिवाय वाट्टेल तसे स्टंट करुन त्या गाड्यांचा तो चक्काचूर करतो, पण विचारणारं कोणीच नाही. एक गाडी खराब झाली की लगेच त्याला दुसरी गाडी मिळते. परंतु खऱ्या आयुष्यात मात्र जेम्स बॉण्ड त्याच्या चित्रपटातील गाड्यांना स्पर्श देखील करत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेम्स बॉण्ड सीरिजमधील ‘नो टाईम टू डाय’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या चित्रपटात जेम्स बॉण्ड साकारणाऱ्या अभिनेता डॅनियल क्रेग याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपटातील गाड्यांबाबत काही आवाक् करणारे खुलासे केले. तो म्हणाला,

“चित्रपटात प्रेक्षकांना अॅस्टर्न मार्टिन DB11, अॅस्टर्न मार्टिन व्हिंटेज, फोर्ड मस्टँग यांसारख्या अनेक महागड्या गाड्या दिसतात. परंतु चित्रीकरण संपताच त्या गांड्यांकडे मी पाहात देखील नाही. कारण ‘स्कायफॉल’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत असताना माझ्याकडून ‘अॅस्टर्न मार्टिन DB 5’ या गाडीचे नुकसान झालं होतं. या गाडीच्या दुरुस्तीसाठी जवळपास आठ कोटी रुपये खर्च झाला होता. त्यावेळी हे पैसे निर्मात्यांनी माझ्या मानधनातून कापले होते. परिणामी माझ्या मानधनातली जवळपास ३० टक्के रक्कम मी एका गाडीच्या दुरुस्तीसाठी दिली होती. शिवाय त्यावेळी निर्मात्यांनी स्टंटचे दृश्य चित्रीत होताच गाडीला हात न लावण्याची मला सक्त ताकित देखील दिली होती. तेव्हापासून मी मनाशी गाठ बांधली की दृश्य चित्रीत होताच जेम्स बॉण्डच्या गाडीला स्पर्श देखील करणार नाही.” असे डॅनियल क्रेग या मुलाखतीत म्हणाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This is why daniel craig was not allowed to drive the james bond car mppg
First published on: 03-03-2020 at 18:38 IST