भारताचा माजी क्रिकेटपटू झहीर खान आणि बॉलिवूड अभिनेत्री सागरिका घाटगे येत्या २७ नोव्हेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. झहीर- सागरिकाच्या या नात्याला आता एक नवी ओळख मिळणार आहे. ‘बॉम्बे टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत या दोघांनी एकमेकांविषयी बऱ्याच गोष्टी मनमोकळेपणाने मांडल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सर्वांशी आदराने आणि विनम्रतेने वागण्याचा झहीरचा स्वभाव सर्वाधिक आवडल्याचं सागरिकाने सांगितलं. याबद्दल झहीर म्हणाला की, ‘मी शांत स्वभावाचा आहे आणि कोणत्याही बाबतीत पटकन निर्णय घेऊ शकत नाही. लोकांच्या वागण्याचा मी स्वत:ला फार त्रास करून घेत नाही. माझी हीच गोष्ट अनेक मित्रांना खटकते. याबाबतीत युवराज नेहमीच माझी मस्करी करतो. मी इतका शांत कसा, याचंच त्याला आश्चर्य वाटत असावं.’ नेहमीच शांत राहण्याचा झहीरचा हा स्वभाव काही प्रमाणात सागरिकालाही खटकतो. ‘तुझा हा गुण चांगला आहे, पण प्रत्येकवेळी ही भूमिका योग्य नाही. कधीकधी मलाही त्याचा त्रास होतो. प्रत्येक गोष्टीबाबत नाही तर निदान काही गोष्टींबाबत तरी तुझं स्वत:चं मत असावं,’ असं ती म्हणते.

वाचा : नवाजुद्दीन सिद्दीकी ‘ते’ वादग्रस्त पुस्तक मागे घेणार

युवराज-हेजलच्या विवाह सोहळ्यात झहीर आणि सागरिका एकत्र दिसून आले होते. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल तर्कवितर्कांना उधाण आले होते. झहीर खान सागरिकाला डेट करत असल्याच्याही बातम्या पुढे आल्या. सहा महिन्यांपूर्वी दोघांची एका मित्राच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे घनिष्ट मैत्रीत रुपांतर झाल्याचे सांगण्यात आले. सागरिकाने नंतर पुढे येऊन झहीरसोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This one thing sagarika ghatge dislikes about zaheer khan
First published on: 30-10-2017 at 19:47 IST