‘ही’ व्यक्ती ठेवणार विराट-अनुष्काच्या मुलीचं नाव

अनुष्काने सोमवारी दुपारी मुलीला जन्म दिला.

क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे. अनुष्काने सोमवारी ११ जानेवारी रोजी दुपारी मुलीला जन्म दिला. विराटने स्व:त ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. आता त्यांच्या मुलीचं नाव काय असेल असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांसमोर आहे.

डीएनएनं दिलेल्या वृत्तानुसार विराट आणि अनुष्काच्या मुलीचं नाव बाबा अनंत महाराज ठेवणार आहेत. विशेष गोष्ट म्हणजे, विराट आणि अनुष्का यांच्या आयुष्यातील निर्णयासंदर्भात महाराज अनंत यांचे नाव पहिल्यांदाच समोर आलेले नाही. या दोघांनी या आधी देखील महाराज अनंत यांच्याकडून सल्ले घेतले आहेत. त्यांच्या लग्नाशी संबंधीत असो किंवा त्यांच्या घर घेण्याच्या संबंधीत असो ते नेहमीच महाराजांचा सल्ला घेतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Kohli (@vk0681)

आणखी वाचा- विरूष्काच्या मुलीचा First Photo आला समोर

अनुष्का आणि बाळाची प्रकृती चांगली असून सध्या त्यांच्या खासगी आयुष्याचा आदर केला जावा, अशी विनंती विराजने सोशल मीडियाद्वारे केली. त्यानंतर विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटोदेखील समोर आला. कोहली कुटुंबातील सर्वच सदस्य या नवीन पाहुणीच्या आमगमाने खूपच आनंदात आहे. विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: This person will name the baby of virat kohli and anushka sharma dcp

Next Story
नाट्यरंग : ‘चित्रगोष्टी’ : चित्रं अन् जगण्याचं अन्योन्य नातं!