Sanju box office day 2 : दोन दिवसांत तब्बल ७३ कोटींची विक्रमी कमाई !

गेल्या सहा महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडीत काढत ‘संजू’नं केवळ दोन दिवसांत ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे.

Sanju Movie
'संजू'
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याच्या आयुष्यावर आधारलेला ‘संजू’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घालत आहे. गेल्या सहा महिन्यात प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईचे विक्रम मोडीत काढत ‘संजू’नं केवळ दोन दिवसांत ७३ कोटी ३५ लाखांची विक्रमी कमाई केली आहे.

Sanju Movie Review : बॉलिवूडचे मैदान फतह करणारा ‘संजू’

यापूर्वी सर्वात कमी कालावधीत सलमानच्या ‘रेस ३’ नं विक्रमी कमाई करत दोन दिवसांत ६० कोटींहून अधिकचा गल्ला कमावला होता. मात्र कामाईच्या शर्यतीत ‘संजू’नं सलमानच्या ‘रेस ३’ ला मागे टाकत सर्वाधिक कमाईचा विक्रम केला आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई करणारा ‘संजू’ हा २०१८ मधला पहिलाच चित्रपट ठरला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटानं ३४.७५ कोटींची कमाई केली. तर शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं ३८.६० कोटींची कमाई केली. रविवारपर्यंत हा चित्रपट १०० कोटींचा टप्पा आरामात पार करेन असं मत चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी मांडलं आहे.

‘प्रेक्षकांच्या अपेक्षांचं दडपण कधीच घेत नाही’

जून महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘रेस ३’ नं तीन दिवसांत १०४ कोटी कमावले होते. २०१३ नंतर रणबीरचे आलेले सगळेच चित्रपट मोठ्या पडद्यावर फ्लॉप गेले. २०१६ साली आलेल्या ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद लाभला होता. बॉम्बे वेलवेट, रॉय, जग्गा जासूस असे रणबीरचे चित्रपट मोठ्या पडद्यावर चांगलेच आदळले होते, त्यामुळे रणबीरचं करिअर सावरण्याच्या दृष्टीनं हा चित्रपट सर्वात महत्त्वाचा होता आणि यात रणबीर पूर्णपणे यशस्वी होताना दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Three of four eggs hatched in a birds nest relocated bluesfest ground