‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अनुराग म्हणजेच अभिनय बेर्डेच्या प्रेयसीची भूमिका साकारणारी आणि काम झाल्यानंतर त्याच्यासोबत सो कॉल्ड ब्रेकअप करणारी ‘मोहिनी’ तुम्हाला आठवतेय का? इशा फडके या अभिनेत्रीने साकारलेली मोहिनीची भूमिका जरी फार मोठी नसली तरीही ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाच्या कथानकाच्या दृष्टीने तिची भूमिकासुद्धा तितकीच महत्त्वाची होती. मोहिनीची ही भूमिका साकारणारी अभिनेत्री इशा फडके अनेकांचीच मनं जिंकून गेली होती. पण, अनेकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ही मोहिनी लग्नबंधनात अडकली आहे.

मराठी कलाविश्वात ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून नावारुपास आलेली अभिनेत्री इशा फडकेने काही महिन्यांपूर्वी आयुष्याच्या या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. सध्या तिच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अतिशय पारंपारिक पद्धतीने झालेल्या या विवाहसोहळ्याला मित्रपरिवाराची उपस्थिती असल्याचंही कळतं.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

isha-phadke-marriage-wedding-photo-01

isha-phadke-marriage-wedding-photo-02

isha-phadke-marriage-wedding-photo-06

चित्रपटात अतिशय मॉडर्न लूकमध्ये दिसलेली इशा तिच्या लग्नात मात्र फार पारंपारिक वेशात पाहायला मिळाली होती. नऊवारी साडी, त्याला साजेशी केशरचना आणि कोणताही भडकपणा नसतानाही खुलून आलेला तिचा चेहरा सर्वांचच लक्ष वेधत होता. अभिनयासोबतच इशा नृत्यकलेतही पारंगत आहे. विविध नृत्यप्रकारांमध्ये तिने नैपुण्य मिळवलं आहे.

isha-phadke-marriage-wedding-photo-08

वाचा : …हे आहेत बॉलिवूडचे ‘कॉन्ट्रोव्हर्शिअल कपल्स’

‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट इशाला बरंच काही देऊन गेला असं म्हणायला हरकत नाहीये. कारण, पदार्पणाच्याच चित्रपटातून तिने अनेकांच्या मनावर छाप पाडण्यात यश मिळवलं होतं. या चित्रपटातून दिग्दर्शक सतीश राजवाडेने नव्या चेहऱ्यांना संधी दिली होती. यात लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे, लिटील चॅम्प्स फेम आर्या आंबेकर, तेजश्री प्रधान, अंकुश चौधरी हे कलाकार झळकले होते.