मध्यप्रदेशचा ‘टिक-टॉक’ स्टार समीर खानला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. समीरने त्याच्या टिकटॉक व्हिडीओमध्ये मास्कची खिल्ली उडवली होती. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. आता करोनाची लागण झाल्यानंतर समीरने त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समीर मध्यप्रदेशच्या एका छोट्या जिल्ह्यातील राहणारा असून त्याठिकाणी करोनाची लागण झालेला हा पहिलाच व्यक्ती आहे. सध्या रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

मास्कची उडवली होती खिल्ली

टिकटॉक व्हिडीओमध्ये समीरने म्हटलं होतं, “अरे, तुम्ही एका छोट्याशा व्हायरसमुळे मास्क का घालत आहात? या छोट्याशा कापडाच्या तुकड्यावर का विश्वास ठेवायचा? विश्वास ठेवायचा असेल तर देवावर ठेवा.”

समीरला शुक्रवारी भोपाळच्या एम्स रुग्णालयात चाचणी केली असताना त्याचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर त्याला बुंदेलखंड मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आलं. रुग्णालयात मास्क घालून समीरने सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला.

समीरला करोनाची लागण झाल्यानंतर तो ज्या ठिकाणी राहायचा, तो परिसर पूर्ण सील करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तो परिसरसुद्धा सॅनिटाइज करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiktok star samir khan tests positive for covid 19 after mocking face mask in his video ssv
First published on: 11-04-2020 at 17:44 IST