बॉलीवूड ‘खिलाडी’ अक्षय कुमार एकावेळी अनेक चित्रपटांचे चित्रीकरण आणि टेलिव्हिजन कार्यक्रमांचे चित्रीकरण लिलया हाताळतो. जर आपल्या कामावर आपल्याला प्रेम असेल तर त्यासाठी वेळेचे नियोजन करणे सोपे जाते.
बॉलीवूडचा अॅक्शन स्टार सध्या ‘डेअर टू डान्स’ या आगळ्यावेगळ्या डान्स ‘रिआलिटी शो’च्या माध्यमातून टेलिव्हिजनवरील पुनरागमनासाठी सज्ज झाला आहे आणि तो त्याबद्दल अतिशय उत्सुकही आहे.
पण, जेव्हा एका वर्षात तीन-चार चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त असूनही अक्षयला टेलिव्हिजनवरील कार्यक्रमांच्या चित्रीकरणासाठी वेळ काढतो. यावर बॉलीवूडकर भारावून गेले आहेत. याबद्दल खुद्द अक्षय म्हणतो की, “दिवसाच्या २४ तासांपैकी आठ तास झोप लागते. त्यानंतर दोन तास व्यायाम आणि मग उर्वरित पूर्ण वेळ आपल्याच हाती असतो. त्यामुळे कोणाला कसा आणि किती वेळ द्यायचा ते आपल्याच हातात असते. यामागे कोणत्याही रॉकेट सायन्सची गरज नाही.”
जर तुम्हाला तुमच्या कामातून आनंद मिळत असेल, तर त्यासाठीची ऊर्जा आपोआप निर्माण होते. जेव्हा आपले काम आपली आवड बनते तेव्हा त्यासाठी वेळेचे नियोजनही आपोआप होऊन जाते. असेही अक्षय पुढे म्हणाला.
अक्षय सध्या दक्षिण आफ्रिकेत ‘लाईफ ओके’ या टेलिव्हिजन वाहिनीवर प्रसारीत होणाऱया ‘डेअर टू डान्स’ या ‘डान्स रिआलिटी शो’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Time management not rocket science akshay kumar
First published on: 03-09-2014 at 07:49 IST