रजनीकांतचे चाहते त्याच्यासाठी काहीही करू शकतात हे आता सगळ्यांना ठाऊक झाले आहे. रजनीकांत यांच्यावरच्या वेड्या प्रेमापोटी हे चाहते काय करतील, याचा काही नेम नाही. आता हेच बघा ना त्यांचे चाहते केवळ आणि केवळ ‘कबाली’ या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहण्यासाठी चक्क जपानवरून चेन्नईत आलेत. पण हे जपानमध्ये राहत असलेले कोणी भारतीय नागरिक नाहीत तर हे जपानचेच रहिवासी आहेत.
काळ्या रंगाचे टी-शर्ट त्यावर रजनीकांत यांचा फोटो असा पेहराव करून हे चाहते खास सिनेमा पाहण्यासाठी चेन्नईत आले. रजनीकांत यांच्या स्टाईलचे आम्ही दिवाने आहोत. त्यांचे जोक्स, त्यांच्या सिनेमाने आम्हाला इतके वेड लावले आहे की त्यांचा चित्रपट आम्हाला पाहायचा होता म्हणून आम्ही जपानवरून चेन्नईत आलो, अशी प्रतिक्रिया या जपनी चाहत्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : Kabali Movie: ‘कबाली’चा मुंबईत नवा इतिहास, वाचा अरोरा टॉकीजमध्ये प्रेक्षकांनी काय केले…

भारतातील लोक तर रजनीकांतचे दिवाने आहेत पण आता त्यांच्या जपानी चाहत्यांना थेट चेन्नईत पाहून संपूर्ण जगातच त्यांचे चाहते आहेत हे ख-या अर्थाने म्हणावे लागेल. केवळ आणि केवळ रजनीकांत याचा चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या या चाहत्यांना बघून रजनीकांतचे चाहते त्यांच्यासाठी कोणताही वेडेपणा करू शकतात या वाक्यावर तुम्हालाही विश्वास ठेवावाच लागेल.

वाचा : ‘कबाली’मधील रजनीकांतच्या लूकने उडवली खळबळ, ‘यंग अवतारा’चे कौतुक

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: To watch kabali movie first day first show die hard japanese fans fly down to chennai
First published on: 22-07-2016 at 18:48 IST