करोना व्हायरसमुळे मनोरंजन विश्वात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. प्रसिद्ध तेलुगू निर्माते पोकुरी रामा राव यांनी शुक्रवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते ६५ वर्षांचे होते. हैदराबादमध्ये त्यांचं निधन झालं. त्यांचा करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची तब्येत आणखी बिघडली. ३ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामा राव यांच्यावर दहा महिन्यांपूर्वी हृदयरोगाशी संबंधित एक शस्त्रक्रिया झाली होती. हैदराबादमध्येच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोकुरी रामा राव हे निर्माते पोकुरी बाबु राव यांचे भाऊ होते. त्यांच्या इथरन फिल्म्सअंतर्गत ‘रणम’, ‘ओंतरी’, ‘यज्ञम’ या चित्रपटांची निर्मिती झाली.

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणुचा प्रादुर्भाव देशात दिवसेंदिवस अधिकच वाढत आहे. मागील चोवीस तासांत देशभरात २४ हजार ८५० नवे करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर, ६१३ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोना रुग्ण संख्या वाढीतील हा आतापर्यंतचा उच्चांक मानला जात आहे. यामुळे देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६ लाख ७३ हजार १६५ वर पोहचली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tollywood producer pokuri rama rao dies due to coronavirus ssv
First published on: 05-07-2020 at 16:59 IST