TOP 10 NEWS : प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्यापासून सलमान-ऐश्वर्यापर्यंत..

बेहरे कुटुंबात या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून नुकतेच लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे Prarthana Behere नाव न चुकता घेतले जाते.

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचे Prarthana Behere नाव न चुकता घेतले जाते. या सौंदर्यवर्ती अभिनेत्रीच्या लग्नाची उत्सुकता तिच्या चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मितवा’ यांसारख्या चित्रपटांतून आणि ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्रार्थना बेहरे येत्या १४ नोव्हेंबरला विवाहबद्ध होणार आहे. ऑगस्टमध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरसह तिचा साखरपुडा झाला. सध्या बेहरे कुटुंबात या लग्नसोहळ्याची जोरदार तयारी सुरू असून नुकतेच लग्नापूर्वीचे काही विधी पार पडले.

प्रार्थना ही एक उत्तम अभिनेत्री असल्याचे आपल्याला माहित आहे. पण तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल फार कमी जणांना माहित असेल. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. प्रार्थनाच्या या भावी जोडीदाराला फिरण्याची आवड असून त्याला वाइनही आवडते. अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती. पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले. तेथूनच चित्रपटांच्या रिळी खरेदी करण्यापासून त्याचा प्रवास सुरु झाला. यानंतर त्याने फॉक्स एण्टरटेंमेन्ट आणि हिस्टरी वाहिनीसाठी माहितीपट तयार करण्यास सुरुवात केली….

प्रार्थना बेहरेच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल ‘या’ गोष्टी माहितीयेत?

‘पद्मावती’च्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार

आणखी एका बॉलिवूड अभिनेत्रीवर विराट कोहलीचा प्रभाव

अखेर एकमेकांसमोर येणार सलमान – ऐश्वर्या

प्राजक्ता माळीने लग्नाविषयीच्या प्रश्नाला दिले ‘हे’ उत्तर

शाहरुखने ट्विट करत म्हटले, फराह खान तू माझं शोषण केलंस

VIDEO : दीपिकाच्या ‘घुमर’वर थिरकल्या बेयॉन्से आणि शकिरा

तैमुर दररोज डिझायनर कपडे घालत नाही- सोहा अली खान

कबड्डीचा थरार ७० एमएमवर…

भारती- हर्षची पत्रिका पाहून तुम्ही हसालच

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Top 10 news from prarthana beheres would be husband to salman aishwarya all bollywood marathi gossip and news

ताज्या बातम्या