शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आणि महानायक अमिताभ बच्चन यांचे जिव्हाळ्याचे संबध होते. बाळासाहेबांनी बच्चन यांना नेहमीच आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे स्थान दिलं, वेळप्रसंगी बाळासाहेब बच्चन यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर बेतलेला सिनेमा ‘ठाकरे’चं टिझर लाँचिगवेळी अमिताभ यांनी बाळासाहेबांशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा दिला. ‘कुली’च्या चित्रिकरणादरम्यान झालेला अपघात, जया बच्चन यांचं स्वागत, कुटुंबावर झालेले आरोप, ते अगदी बाळासाहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत अनेक आठवणी जिवंत करण्यात अमिताभ बच्चन हरवून गेले.
‘कुली’नंतर बच्चन यांनी बाळासाहेबांच्या शेवटच्या काळतली आठवणही सांगितली. ‘बाळासाहेब शेवटच्या क्षणी जेव्हा अंथरुणाला खिळले होते, तेव्हा त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी मला उद्धव ठाकरे यांनी दिली. एका तुफान वादळाला आणि धडाडीच्या नेत्याला अशा अवस्थेत पाहून माझ्या काळजाचं पाणी झालं. त्याक्षणी माझं लक्ष दुसरीकडे गेलं. त्यावेळी मी जे काही पाहिलं ते मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. बाळासाहेब जिथे झोपले होते, तिथे डाव्या बाजूला एक छायाचित्र होतं आणि ते छायाचित्र माझं होतं. बाळासाहेबाचं माझ्यावर प्रेम आहे हे मला ठाऊक होतं पण माझ्यावर त्यांचा स्नेह सर्वाधिक होता हे मला त्या दिवशी प्रकर्षानं जाणवलं. ‘
‘बाळासाहेब अंथरूणावर खिळलेले असताना त्यांच्या खोलीत माझा फोटो होता’
जाणून घ्या, अनुष्का शर्माच्या रॉयल ज्वेलरीची किंमत
प्रिंस हॅरी-मेगन मार्कलच्या साखरपुड्याचे रॉयल फोटो
..म्हणून सलमानच्या एक्स मॅनेजरला ऐश्वर्याने ठेवले कामावर
पाहा, विराट-अनुष्काला पंतप्रधानांनी काय गिफ्ट दिले
Video : त्यावेळी शिवसेनेची रूग्णवाहिका होती, म्हणून मी वाचलो-अमिताभ बच्चन
‘पॅडमॅन’साठी अक्षय माझी पहिली पसंती नव्हता- ट्विंकल
VIDEO : विरुष्काच्या रिसेप्शनमध्ये ‘या’ पाहुण्याने वेधले सर्वांचे लक्ष
जयपूरमध्ये सलमानच्या ‘टायगर जिंदा है’चे पोस्टर जाळले
‘बाळासाहेब अंथरूणावर खिळलेले असताना त्यांच्या खोलीत माझा फोटो होता’