छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणजे ‘बिग बॉस.’ सध्या बिग बॉस मराठीचे तिसरे सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. शोमध्ये स्पर्धकांमध्ये सतत भांडणे आणि वाद होतच असतात. अशातच आता बिग बॉसच्या घरातून जे स्पर्धक बाहेर पडले त्यांची पुन्हा एण्ट्री होणार आहे. यामध्ये तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्यचा समावेश आहे. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत, कोण बरोबर खेळत आहेत, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे हे या तिघांनी सांगितले.  स्नेहाने जयला खडे बोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंनी भरभरून कौतुक केले. तृप्ती ताईंकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रू अनावर झाले.

तृप्तीताई म्हणाल्या, “विशाल एकदम मस्त… मागच्या आठवड्यात जो ट्रॅक चेंज केलास ना, वन मॅन आर्मी. जे मी पहिल्यापासून सांगत होते कुठे तरी चेंज झाला पाहिजे आणि तुम्हाला सांगितले की, सत्य परेशान हो सकता है पराजित नही! लंबी रेस का घोडा है तू! मस्त एकदम. आणि मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं.”
VIDEO: सेक्स की फूड?; समांथाने दिलेल्या उत्तराने उंचावल्या चाहत्यांच्या भुवया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर दुसरीकडे स्नेहाने जयवर गंभीर आरोप केले. त्यानंतर जय भावूक झालेला दिसत आहे. यावेळी त्याला उत्कर्ष आणि मीरा समजावताना दिसत आहेत. मीरा जयला हा ही टास्कचा एक भाग आहे वाईट वाटून नको घेऊ असे सांगताना दिसत आहेत. दरम्यान, यानंतर आता हे तीन नवीन सदस्य अजून किती दिवस घरात राहणार? यादरम्यान काय काय घडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.