‘दुनियादारी’, ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर बॉक्स ऑफीसवर संजय जाधव यांची आणखी एक चित्रपट येण्यास सज्ज आहे. प्रेक्षकांना प्रेम , मैत्री या नात्यावर विश्वास ठेवायला शिकवणाऱ्या या चित्रपटांच्या यादीत आता ‘तू
ही रे’ दाखल होत आहे. ‘प्यारवाली लव्हस्टोरी’ने प्रेमाच्या एका अनोख्या जगात नेलं तर ‘दुनियादारी’ने मैत्रीची सफर घडवून आणली. आता ‘तू ही रे’ प्रेक्षकांना कोणत्या वळणा वर घेऊन जाईल याबाबत आतापासून उत्सुकता निर्माण झाली आहे. मालाड येथील इनॉबिर्ट मॉलमध्ये नुकतच संजय जाधव यांच्या आगामी ‘तू ही रे’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. रोमॅंटिक सागा असलेल्या ‘तू ही रे’ सिनेमाची झलक या निमित्ताने सगळ्यांनी अनुभवली. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित, सुशांत शेलार, गिरीश ओक अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात प्रेक्षकांना पुन्हा एकदा लव्ह स्टोरी एका वेगळ्या रुपात पाहायला मिळणार आहे. संजय जाधव यांच्या चित्रपटातील काही वैशिष्ठ्यांपैकी एका म्हणजे सिनेमाची गाणी. अशी ओठांवर रेंगाळणारी गाणी गुरु ठाकूर यांनी लिहिली आहेत. पंकज पडघन आणि अमितराज, शशांक पोवार या तिघांनी मिळून सिनेमाला संगीत दिला आहे. आदर्श शिंदे, अमितराज, वैशाली सामंत, उर्मिला धनगर यांनी सिनेमाची गाणी तर गायली आहेत. सिनेमाची जान म्हणजेच कथा अरविंद जगताप यांनी लिहिली आहे. प्रसाद भेंडे यांच्या कॅमेऱ्याची जादू यंदाही आपल्याला या सिनेमात दिसणार आहे. करण एंटरटेनमेंटचे मृदुला पडवळ- ओझा, शीतल कुंमार-मानेरे, इंडियन फिल्म्स स्टूडिओचे आशिष वाघ आणि उत्पल आचार्य तसेच ड्रिमिंग २४/७ चे दिपक राणे यांच्यासह संजय घोडावत हे सहनिर्माते या सिनेमासाठी यंदा एकत्र आले आहेत. ‘तू ही रे’ हा चित्रपट ४ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने सगळ्यांनाच सिनेमाची उत्सुकता लागली आहे यात शंका नाही.
संग्रहित लेख, दिनांक 7th Jul 2015 रोजी प्रकाशित
संजय जाधव यांच्या ‘तू ही रे’ सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर लाँच
'दुनियादारी', 'प्यारवाली लव्हस्टोरी' या सुपरहिट चित्रपटांनंतर बॉक्स ऑफीसवर संजय जाधव यांची आणखी एक चित्रपट येण्यास सज्ज आहे.

First published on: 07-07-2015 at 07:48 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tu hi re new marathi movie