नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली ‘तुझं माझं जमतंय’ ही मालिका चर्चेत आहे. अश्विनी, शुभंकर यांना एकत्र आणण्यासाठी मालिकेत पम्मी करत असलेले प्रयत्न आणि त्यांचं त्रिकुट हे प्रेक्षकांचं भरगोस मनोरंजन करतंय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपूर्वा नेमळेकर ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असून ती नेहमीच आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही पोस्ट करत असते. चाहते देखील तिच्या फोटोज आणि व्हिडीओजवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. तिने नुकताच सोशल मीडियावर ‘तुझं माझं जमतंय’ या मालिकेतील आशु आणि शुभू म्हणजेच अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री मोनिका बागुल यांच्यासोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात पम्मी शुभूला आशूला पटविण्याचे फंडे शिकवत आहे. मालिकेत जसं पम्मी आशु आणि शुभूला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करतेय त्याचीच झलक तिने या व्हिडिओमधून चाहत्यांना दिली आहे. हा धमाल व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

अपूर्वा नेमळेकरने या मालिकेतून टीव्ही माध्यमात पुनरागमन केलं त्यामुळे तिला पुन्हा एकदा टीव्हीवर पाहायला मिळतंय याचा आनंद प्रेक्षकांना आहे. अपूर्वा सोबतच रोशन विचारे आणि मोनिका बागुल या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. या मालिकेचं शूटिंग नगरमध्ये चालू आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujh majh jamtay serial pammi giving leasson to subhu avb
First published on: 11-12-2020 at 19:01 IST