तुला पाहते रे : ‘राजनंदिनी’चा ऑफस्क्रीन पती सुबोध भावेलाही देईल टक्कर

शिल्पाने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आहेत. पाहा फोटो..

shilpa-tulaskar-
शिल्पा तुळस्कर

झी मराठी वाहिनीवरील ‘तुला पाहते रे’ मालिकेत राजनंदिनी या भूमिकेची एण्ट्री काही दिवसांपूर्वी झाली. अभिनेत्री शिल्पा तुळस्कर राजनंदिनीची भूमिका साकारत आहे. गेल्या काही महिन्यांपासून या भूमिकेची जोरदार चर्चा होती. त्यामुळे राजनंदिनीच्या एण्ट्रीने मालिकेला चांगलाच टीआरपी मिळवून दिला. इतकंच नव्हे तर गुगलवरही शिल्पा तुळस्करविषयीचा सर्च वाढू लागला.

शिल्पाने आजवर अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘दिल मिल गए’, ‘संजीवनी’, ‘लेडिज स्पेशल’ यांसारख्या मालिकांमध्ये तिने भूमिका साकारली आहे. सोशल मीडियावरही ती सक्रीय असते. शिल्पाचे लग्न झालेले असून तिला दोन मुलं आहेत. शिल्पाचा ऑफस्क्रीन पती हा सुबोध भावेलाही टक्कर देण्याइतका हँडसम आहे असं म्हणायला हरकत नाही. सोशल मीडियावरील त्याचे फोटो पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.

https://www.instagram.com/p/BttMLyrli4u/

https://www.instagram.com/p/BqzsMkwFOie/

विशाल शेट्टी असं शिल्पाच्या पतीचं नाव असून विवान आणि शैवा अशी त्यांच्या मुलांची नावं आहेत. विशाल व्यावसायिक असून शिल्पाच्या इन्स्टाग्रामच्या प्रोफाईलमध्ये ती अनेकवेळी तिच्या पतीसोबतचे फोटो पोस्ट करते.

https://www.instagram.com/p/BqWMb7IFK0f/

‘तुला पाहते रे’ मालिकेच्या शीर्षकगीतातही शिल्पाला पाहिलं गेलं. त्यामुळे तिच्या भूमिकेची प्रेक्षकांना उत्सुकता होतीच. आता मालिकेत तिच्या येण्याने मालिकेची लोकप्रियता आणखीनच वाढली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tula pahate re shilpa tulaskar husband photos