डिस्ने प्लस हॉटस्टारवरच्या यशस्वी पदार्पणानंतर ‘ओके कंप्यूटर’ या सीरिजने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव रॉटरडॅम’2021 मध्ये आपला यूरोपीयन प्रीमियर साजरा केला. पूजा शेट्टी आणि नील पेजदारद्वारा रचित आणि निर्देशित, ओके कंप्यूटर ब्राइट फ्यूचर प्रोग्राम अंतर्गत येणारी आणि प्रदर्शित होणारी पहिली वेब सीरिज असून जगभरातील उभरत्या चित्रपट प्रतिभांना समर्पित करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंद गांधी निर्मित ‘ओके कंप्यूटर’ ही सहा भागांची सीरिज आहे. ही एक दृष्टिपथात असलेल्या यथार्थवादी भविष्याची कल्पना आहे. ज्यात चहावाल्या ‘माउशी’ बॉट्स, इमर्सिव वीआर वर्ल्ड आणि रोबोट मसीहा इत्यादींचा समावेश आहे. ब्लॅक पँथरने ज्या तऱ्हेने एफ्रोफ्यूचरिज्म मांडला अगदी त्याचप्रमाणे, ओके कंप्यूटर जगाला ‘इंडो-फ्यूचरिज्म’ची ओळख करून देतो.

निर्माता आनंद गांधी सीरिजविषयी म्हणाला की, “हा दिग्दर्शक पूजा शेट्टी आणि नील पेजदार यांच्या दृष्टिकोनाचा गौरव आहे. ही मेमेसिसच्या दूरदृष्टिला आश्वासित करणारी गोष्ट आहे कि अभूतपूर्व कथा साकारणाऱ्या नव्या आवाजाला आणि त्यांच्या दूरदर्शीपणाला देखील निरंतर चांगला मंच उपलब्ध होतो आहे.” आनंद गांधी त्यांच्या ‘तुंबाड’ आणि ‘शिप ऑफ थीसस’साठी ओळखले जातात. ‘ओके कंप्यूटर’ ही सीरिज प्रेक्षकांना डिस्नेप्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tumbad fame anand gandhi ok computer web series avb
First published on: 18-06-2021 at 18:05 IST