बिग बॉसच्या घरातून अनेक जोड्या बाहेर पडतात मात्र नंतर त्यांच्यातील नात्यांमध्ये दुरावा येतो. असंच काहीसं गौहर खान आणि कुशल टंडनच्या बाबतीत झालं होतं. मात्र गौहर खानने आता लग्न केलं असून आपला भूतकाळ मागे सोडला आहे. पण नुकतंच ‘बिग बॉस ७ ‘मधील ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. याचं कारण ट्विटरवर एका युजरने कुशल टंडनसोबतच्या नात्यावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला असता गौहर खानने त्याला चोख प्रुत्युत्तर दिलं. या युजरने गौहर खानवर कुशल टंडनचं धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता.

काय आहे नेमकं प्रकरण –

कुशल टंडन आणि गौहर खान धर्मामुळेच एकमेकांपासून दूर गेल्याचं बोललं जात आहे. गौहर खानकडून कुशल टंडनवर धर्म परिवर्तन करण्यासाठी जोर दिला जात होता आणि त्यातूनच ते वेगळे झाले असा दावा आहे.

ट्विटरवर दिलं उत्तर –

एका युजरने याच मुद्द्यावरुन ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तसंच “भारतात अजूनही हिंदू आणि मुस्लिमांसाठी वेगळे कौटुंबिक कायदे आहेत हे बाहेरच्या जगाला माहिती नाही. हिंदूंनी धर्मनिरपेक्ष नियमांचे पालन केले पाहिजे. मुस्लिम चार बायका ठेवू शकतात आणि शरियाच्या नावावर त्यांच्या बायका आणि मुलींच्या शिक्षणावर बंदी घालू शकतात. #UniformCivilCode सर्व भारतीयांना लागू करणे आवश्यक आहे,” असंही या युजरने म्हटलं होतं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गौहर खान आणि कुशल टंडनमध्ये बिग बॉसच्या घरात सुरु झालेलं प्रेमप्रकरण एक वर्षाहून अधिक काळ सुरु होतं. २०१४ मध्ये दोघांचा ब्रेकअप झाला. कुशलने सोशल मीडियावरुन गौहर खानसोबतच्या ब्रेकअपची माहिती दिली होती. मात्र अजूनही दोघे खूप चांगले मित्र आहेत.