scorecardresearch

केक कापायला गेली आणि लागली केसांना आग, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्रीने स्वत: हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

केक कापायला गेली आणि लागली केसांना आग, अभिनेत्रीचा व्हिडीओ व्हायरल
तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

हॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री निकोल रिचीने नुकताच तिचा ४०वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. वाढदिवस साजरा करतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. त्यामधील एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये निकोलच्या केसांना आग लागली आहे.

निकोलने वाढदिवशी काळ्या रंगाचा टॉप परिधान केला होत्या. वर केस मोकळे ठेवले होते. निकोल केक कापण्यापूर्वी मेणबत्ती विझवण्याकरता फुंकर मारण्यासाठी थोडं खाली वाकते. तेवढ्यात तिच्या मोकळ्या केसांना आग लागते. लगेच तिची मैत्रीण ती आग विझवण्याचा प्रयत्न करते. तिचा हा व्हिडीओ स्वत: निकोलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत.

आणखी वाचा : ‘या’ मराठमोळ्या हास्यसम्राटासमोर चक्क शहेनशाह आदराने झुकले, फोटो व्हायरल

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. एका यूजरने ‘ही मुलगी आग लावून टाकेल’ असे म्हटले होते. तर दुसऱ्या एका यूजरने आता पुढच्या कोणत्याच वाढदिवशी ही मेणबत्ती विझवणार नाही. अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

‘द सिंपल लाइफ’ या शोमुळे निकोल रिचीला लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने अनेक रिअॅलिटी शोमध्ये परिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर तिचे तिच्या खास मैत्रीणीसोबत वाद झाल्यामुळे ती चर्चेत होती. २००६मध्ये तिने लग्न केले.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tv personality nicole richie hair caught fire as she cut her 40th birthday cake video viral avb

ताज्या बातम्या