कोसला ते हिंदू या उण्यापुऱ्या पाच दशकांच्या साहित्य प्रवासाने मराठी भाषेला उदाहरणार्थ समृद्ध वगैरे करणारे ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावरील ‘उदाहरणार्थ नेमाडे’ या डॉक्युफिक्शन चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमध्ये नेमाडे यांच्या पुस्तकातील काही पात्रे आणि जागा पाहायला मिळतात. या चित्रपटाच्या माध्यमातून भालचंद्र नेमाडे यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. येत्या २७ मे रोजी भालचंद्र नेमाडे यांच्या जन्मदिनी हा चित्रपट सर्व ठिकाणी प्रदर्शित होणार आहे. अक्षय इंडीकर दिग्दर्शित या चित्रपटात संजय मोरे, केतकी नारायण आणि दस्तुरखुद्द भालचंद्र नेमाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. नेमाडेंचे विचार आणि त्यांचा साहित्यिक प्रवास माहित असणाऱ्या आणि न माहित असणाऱ्या सर्वांसाठीच हा चित्रपट विशेष पर्वणी ठरणार आहे.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
once upon a tome the misadventures of a rare bookseller book review
बुकमार्क : पुस्तकवेडे आणि बाकीचे सगळे!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला