ब्रिटिश-एशियन साप्ताहिक इस्टर्न आयने  ‘१०० महान बॉलिवूड स्टार्स’च्या केलेल्या पाहाणीत भारतीय चित्रपटसृष्टीचा भक्कम आधार आणि बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चनची ‘महान बॉलिवूड स्टार’ म्हणून निवड झाली आहे. सोशल मीडियाद्वारे प्रेक्षकांनी नोंदवलेली मते, बॉक्स ऑफिसवर मिळवलेले यश आणि समीक्षकांची वाखाणणी या निकषावर  ही पाहाणी करण्यात आली. या पाहाणीत अमिताभने आघाडीचे स्थान पटकावले असून, त्याच्या पाठोपाठ दिलीप कुमारचे नाव आहे. तर, शाहरूख खान तिस-या स्थानावर आहे.  या यादीत चौथ्या स्थानावर असलेल्या माधुरीने अभिनेत्रींमध्ये पहिले स्थान पटकावले आहे.
प्रथम दहामध्ये राजकपूर ५ व्या, नर्गिस ६ व्या, देवानंद ७ व्या, वहिदा रेहमान ८ व्या, राजेश खन्ना ९ व्या आणि श्रीदेवी १० व्या स्थानावर आहे. याशिवाय अन्य प्रसिद्ध कलाकारांमध्ये सलमान खान ११ व्या, आमिर खान १४ व्या, धर्मेन्द्र १५ व्या, हेमा मालिनी १८ व्या, मधुबाला २४ व्या, काजोल ३० व्या, हृतिक रोशन ३२ व्या, राणी मुखर्जी ३८ व्या, करिना कपूर ४३ व्या, मुमताझ ५० व्या, सैफ अली खान ५९ व्या, प्रियांका चोप्रा ८६ व्या आणि कतरिना कैफ ९३ व्या स्थानावर आहे.